Shivsena UBT : चिपळूण झालं आता वैभववाडीत ठाकरे शिवसेनेला खिंडार; युवा सेना चिटणीसनेच सोडली पक्षाची साथ

YuvaSena UBT : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक धक्के हे कोकणात बसत असून येथे अनेक दिग्गज नेते पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत. आताही सिंधुदुर्गात शिवसेनेला खिंडार पडले आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Vaibhavwadi News : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात कोकणात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. तसेच भाजपनेदेखील सदस्य नोंदणी कार्यक्रमातून गाव पातळीवर कमळ फुलवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे कोकणात सर्वाधिक नुकसान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचे होताना दिसत आहे. काहीच दिवसापूर्वी कोकणातील ठाकरे गटाचा मोठा नेता शिवसेनेत गेल्यानंतर येथे ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवकही शिवसेनेची साथ सोडत आहेत. आता युवासेनेच्या पदाधिकाऱ्यानेच शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे वैभववाडील ठाकरे गटाला खिंडार पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काहीच दिवसाआधी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेकांनी शिंदे यांच्या शिवसेनेचा रस्ता धरला होता. यानंतर आता ठाकरे शिवसेनेचे युवा सेना चिटणीस स्वप्नील धुरी, सोनाळी सरपंच भीमराव भोसले, खांबाळे माजी उपसरपंच गणेश पवार यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे पालकमंत्री नीतेश राणे यांनी ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

स्वप्नील धुरी याने पालकमंत्री राणे वैभववाडी दौऱ्यावर असताना भाजप कार्यालयात प्रवेश केला. धुरींनी आपल्या पदाचा आधीच राजीनामा दिला होता. तर आता भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद युवा सेना विभागप्रमुख राजेश पवार, युवा सेना उपतालुकाप्रमुख सत्यवान सुतार, दिगशी शाखाप्रमुख देवेंद्र पाष्टे, युवासेना उपविभागप्रमुख जयेश पवार यांच्यासह ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे हा प्रवेश ठाकरे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून खिंडार पडल्याचे बोलले जातेय.

Shivsena UBT News
Solapur Shivsena UBT : ठाकरेंकडून तिसऱ्याच दिवशी डॅमेज कंट्रोल; शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुखपदाची धुरा पुन्हा तरुण शिवसैनिकाच्या खांद्यावर

दरम्यान शेजारील जिल्ह्यात देखील ठाकरे गटाला गळती लागल्याने चिपळूण शहर शिवसेना पोरकी झालीय. येथे ठाकरे गटाचे चिपळूण शहर प्रमुख शशिकांत मोदींचा राजीनामा दिल्याने मोठे खळबळ उडाली होती. माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे आता येथे चिपळूण शहर प्रमुखासाठी रस्सी खेच सुरू झाली आहे. तर शहरप्रमुख पदासाठी माजी नगरसेवक मनोज शिंदे, संतोष पवार, भैय्या कदम, माजी नगरसेवक संजय रेडीज यांची नावे पदासाठी चर्चेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com