शिवसेनेची सर्वात मोठी चूक ते राष्ट्रवादी बरोबर आहेत...

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी काल मतदान व मतमोजणी झाली. यात सहावी जागा भाजपने जिंकत महाविकास आघाडीला धक्का दिला. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली. ( Shiv Sena's biggest mistake is they are with NCP ... )

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, "या निकालाचा धक्का सर्वांना बसला. शिवसेना व मुख्यमंत्र्यांना धक्का बसला. आम्हाला आनंदाचा धक्का बसला. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले की, 'मला कुठलाही धक्का बसला नाही.' याचा अर्थ त्यांना आधीच हा निकाल माहिती होता. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागत असताना देखील स्वतःचे उमेदवार सुरक्षित करून शिवसेनेचा उमेदवार वाऱ्यावर सोडून देण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केले. हे त्यांच्या मताधिक्यावरून सिद्ध होते," असे मत डॉ. विखे पाटील यांनी मांडले.

Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे पाटील आणि माझे बोलणे झाले आहे; भविष्यात ते धनुष्यबाण हाती घेतील : नार्वेकरांची गुगली

ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीत कार्यरत असलेल्या शिवसेनेची ही सर्वात मोठी चूक ही आहे की, ते राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहेत. मी सहा महिन्यांपासून हेच भाकीत करत आलो आहे की, राष्ट्रवादीने शिवसेनेला संपविण्यासाठी आघाडी केली आहे. मागील अडीच वर्षांमध्ये जेवढे पक्ष प्रवेश राष्ट्रवादी झाले, त्यातील 70 टक्के पक्ष प्रवेश शिवसेनेतून झाले आहेत. जर संजय राऊत यांना 41 मते पडतात. मग शिवसेनेनी फक्त आपल्या चौथ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्राप्त मते दिली," असा आरोपही त्यांनी केला.

Dr. Sujay Vikhe Patil
मला नगर जिल्ह्यात कोणी मित्र नाही

"उरलेली प्रथम प्राधान्याची मते संजय पवार यांना दिली. मग काँग्रेसने 44 मते का घेतली 41वर समाधान का मानले नाही. प्रफुल्ल पटेल यांनी 41 मते घेऊन उर्वरित मते का दुसऱ्याला दिली नाहीत. याचा अर्थ असा आहे की यामध्ये मुळातच फार मोठे शड्यंत्र होते. ते कोणी रचले का रचले हे माहिती नाही. मात्र महाविकास आघाडीत मुख्यत्वे मुख्यमंत्र्यांना त्यांचा स्वाभिमान व त्यांची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी त्यांच्या मित्र पक्षांनी कुठलाही प्रयत्न केलेला दिसत नाही. यावरून आज सकाळी दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी या निकालाने अजिबात धक्का लागला नसल्याचे सांगितले. एखाद्या निकालानंतर आश्चर्य न वाटणे म्हणजे हा निकाल अपेक्षित असणे, असेच ग्राह्य असते म्हणून त्यांच्या वक्यातच सर्व आले आहे. त्यांना हा निकाल माहिती होता. त्यांनी त्यांच्या वक्तव्यातच सर्व खुलासा दिला," असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Dr. Sujay Vikhe Patil
राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीने नगर-मनमाड रस्त्याच्या कामात मागितली टक्केवारी : डॉ. सुजय विखे पाटील

मंत्री भ्रष्टाचारी तरीही आमच्यावर घोडेबाजारीचा आरोप

"राज्यसभेच्या निवडणुकीत मिळालेले यशाचे श्रेय राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जाते. त्यांनी जी रणनीती आखली. त्यांनी जी मताची बेरीज केली. ती अतिशय शांतपणे, मीडियासमोर न येता. त्यांची टीम, कोअर टीम यांनी सहभागी होऊन आज जे प्राप्त केले आहे. याबाबत मला वाटते की, अशा पद्धतीच्या निवडणुका महाराष्ट्राने कधी पाहिल्या नाहीत. योग्य नियोजनातून निवडणूक अशी होऊ शकते हे आज महाराष्ट्राला भाजपच्या माध्यमातून पहायला मिळाले. पराभव झाल्यावर आरोप-प्रत्यारोप करणे सोपे आहे. आज सरकार त्यांचे आहे. त्यांचे मंत्री 100 कोटी रुपये मागितल्याच्या कारणाने जेलमध्ये आहेत. मग आमच्याकडे पैसे असल्याचा आरोप कसा काय करतात. मुंबई महापालिकेत शिवसेनेकडे सत्ता आहे. मुंबई महापालिकेत हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सांगितले. हा महाविकास आघाडीतील विसंवाद आहे, तो जनतेसमोर येईल," असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com