Chandgad Politics : चंदगडच्या 50 वर्षांच्या विकासावरून वाद, राजेश पाटलांचा आमदार शिवाजी पाटलांवर पलटवार

Shivaji Patil vs Rajesh Patil Political Clash : आमदार शिवाजी पाटील यांनी माहिती घेऊन बोलायला पाहिजे होते असं आवाहान माजी आमदार राजेश पाटील यांनी केलं आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात माझ्यावर गेल्या 5 वर्षात शंभर रुपयांचाही निधी आणला नसल्याचा आरोप केला.
Rajesh Patil, Shivaji Patil
Rajesh Patil addressing the media regarding Shivaji Patil’s birthday remarks, highlighting Rs. 8.64 crore road funding and denying neglect claimsSarkarnama
Published on
Updated on

Chandgad News, 03 Aug : आमदार शिवाजी पाटील यांनी माहिती घेऊन बोलायला पाहिजे होते असं आवाहान माजी आमदार राजेश पाटील यांनी केलं आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात माझ्यावर गेल्या 5 वर्षात शंभर रुपयांचाही निधी आणला नसल्याचा आरोप केला.

मात्र, त्यांनी माहिती घेऊन बोलायला पाहिजे होतं, असं म्हणत माजी आमदार राजेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकातून नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात दरवर्षी सरासरी 2200 ते 2300 मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे रस्ते लवकर खराब होतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीबाबत अतिशय दक्ष राहून काम करावे लागते.

बेळगाव-वेंगुर्ला हा महत्त्वाचा रस्ता असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी 8 कोटी 64 लाखांचा निधी वापरला. सरकारी कार्यालयात याबाबतची माहिती उपलब्ध आहे. मात्र, मागील 50 वर्षांत तालुक्याचा विकास झाला नाही, असा आरोपही आमदार पाटील यांनी केला. शिवाय ते आमदार बोलत असताना व्यासपीठावर माजी राज्यमंत्री भरमू पाटील उपस्थित होते.

Rajesh Patil, Shivaji Patil
Madhuri Elephant Protest : आता थांबायचं न्हाय, महादेवीला परत आणायचाय! कोल्हापुरकरांचा निर्धार; पहाटे 5 पासून हजारो नागरिक रस्त्यावर

त्यांनी यावर एकही शब्द उच्चारला नाही, अर्थ त्यांना हा आरोप मान्य आहे का? असा सवालही राजेश पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, राजेश पाटलांच्या या वक्तव्यावर आमदार शिवाजी पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आमदार पाटील म्हणाले, माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राजकीय मुद्द्यावरून मी जी काही टीकाटिप्पणी केली, ती माझ्यावरील आरोपांना प्रत्युत्तर होते. त्यातून कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. शिवाय माझा पिंड राजकीय नाही. त्यामुळे पोटात एक आणि ओठात एक अशा स्वरूपाचे बोलणे मला जमत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

Rajesh Patil, Shivaji Patil
Kolhapur Politics : "एकतर्फी प्रेम होत नसतं, जे पेराल तेच उगवणार..."; नाव न घेता महाडिकांचा सतेज पाटलांना डिवचलं

तसंच यावेळी ते म्हणाले, विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केल्यामुळे मी त्यांना उत्तर दिले. मी कोणालाही दुखावणारा, अन्याय करणारा व्यक्ती नाही. शिवाय राजू शेट्टी यांच्याविषयी माझ्या मनात अपार आदर होता.

मात्र, शक्तिपीठच्या मुद्द्यावरून त्यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मी आजही शक्तिपीठचे स्वागत करतो. या मार्गामुळे माझ्या भागातील दळणवळणाला गती येणार असेल, माझ्या भागातील शेतमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असेल, तर मी त्याचे समर्थन करायचे नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com