Solapur Congress : सुशीलकुमार शिंदे लोकसभेच्या तोंडावर मंगळवेढ्याच्या शिवाजीराव काळुंगेंवर नवी जबाबदारी देणार?

Shivajirao Kalunge News : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षाची अडचण निर्माण झाली आहे.
Shivajirao Kalunge-Sushilkumar Shinde
Shivajirao Kalunge-Sushilkumar ShindeSarkarnama

Mangalvedha News : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षाची अडचण निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली काँग्रेसकडून सुरू आहेत. त्यात मंगळवेढ्याचे शिवाजीराव काळुंगे यांचेही नाव चर्चेत आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या दोन पराभवाच्या कटू आठवणी पुसण्यासाठी काँग्रेसचे नेते जोरात कामाला लागले आहेत. जनतेच्या प्रश्नावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात लोकसभेची निवडणूक होत असून, गेल्या वर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यानंतरही सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांचा ट्रिगर वनमध्ये समावेश झालेला नाही. याशिवाय शेतीचे पाणी, रोजगार, रेल्वे आदी विषयांवर जनतेमध्ये सत्ताधाऱ्या विरोधात असंतोषाचे वातावरण आहे. मात्र, या विषयांवर आवाज उठवून फायदा उचलण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत नाही. प्रणिती शिंदे (Praniti Shinde) गेल्या काही दिवसांपासून मंगळवेढ्यातील पाणी प्रश्नावर बोलताना दिसत आहेत. मात्र, कालच्या त्यांच्या भाषणात काही लोकांनी अडथळे आणले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivajirao Kalunge-Sushilkumar Shinde
Hatkangle Loksabha Constituency : राजू शेट्टींचा नकार; उद्धव ठाकरेंचा दोन माजी आमदारांना सांगावा, ‘तुम्ही तयारी करा'

सोलापूर (Solapur) लोकसभेची जागा पुन्हा मिळविण्याच्या दृष्टीने माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite Patil) हे सध्या एका न्यायालयीन प्रकरणामुळे गायब आहेत, त्यामुळे सोलापूर लोकसभेच्या आखाड्यात काँग्रेसचे सारथ्य कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तो प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून सोलापूर काँग्रेसमध्ये सध्या हालचाली सुरू आहेत.

काँग्रेसकडून सध्या प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यात कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. काही नावे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविल्याची चर्चा आहे. आता त्यात मंगळवेढ्याचे शिवाजीराव काळुंगे (Shivajirao Kalunge) यांचे नावही पुढे येत आहे. काळुंगे हे काँग्रेस स्थापनेपासून (स्व.) कि. रा. मर्दा यांच्यापासून आजतागायत काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. सुशीलकुमार शिंदे यांच्या निवडणुकीत मंगळवेढ्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

Shivajirao Kalunge-Sushilkumar Shinde
Nanded Lok Sabha Constituency : चव्हाणांची शिफारस अन्‌ फडणवीसांची शिष्टाई खतगावकरांना उमेदवारीची भेट देणार?

काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिवाजीराव काळुंगे यांचे कौतुक केले होते. पवार यांनी शिवाजीराव काळुंगे यांच्यासारखा माणूस आपल्या पक्षात का आणला नाही, याची विचारणा त्या वेळी पक्षाच्या नेत्यांना केली होती.

R

Shivajirao Kalunge-Sushilkumar Shinde
Shelke Reply to Pawar : पवारांच्या इशाऱ्याला शेळकेंचे उत्तर; ‘असल्या घाणेरड्या राजकारणाची वेळ माझ्यावर अजून आली नाही'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com