Hatkangle Loksabha Constituency : राजू शेट्टींचा नकार; उद्धव ठाकरेंचा दोन माजी आमदारांना सांगावा, ‘तुम्ही तयारी करा'

Mahavikas Aghadi News : कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत जाणार नसल्याची घोषणा करून शेट्टी हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शेट्टी यांना सोबत घेण्याचा महाआघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मातोश्रीवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
Hatkangle Loksabha Constituency
Hatkangle Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अद्यापही आपली लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चर्चा सुरू आहे. असे असताना राजू शेट्टी यांनी 'एकला चलो' ची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीची स्वाभिमानीला सोबत घेण्याची तयारी असली तरी शेट्टी आपण स्वतंत्र राहण्यावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत जाणार नसल्याची घोषणा करून शेट्टी हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी शेवटपर्यंत शेट्टी यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मातोश्रीवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

राजू शेट्टी यांनी महिनाभरापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती भेट महत्त्वपूर्ण होती. सध्या महाविकास आघाडीत जागावाटप सुरू आहे. हातकणंगलेची (Hatkangle) जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडल्याचे सांगितले जाते. मात्र, ही जागा शिवसेना ठाकरे गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार असल्याचे सांगितले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hatkangle Loksabha Constituency
Nanded Lok Sabha Constituency : चव्हाणांची शिफारस अन्‌ फडणवीसांची शिष्टाई खतगावकरांना उमेदवारीची भेट देणार?

आजपर्यंतच्या अनुभवानुसार छोट्या-मोठ्या घटक पक्षांच्या मत विभाजनामुळे आघाडीला फटका बसत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे यंदा छोट्या-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला सोडणार असल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे, महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तयार नाही. महाविकास आघाडीत जाण्यास सध्या तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नकार दिला आहे. पण, पाठिंबा दिला तर आम्ही स्वीकारू, असे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत येऊन पाठिंबा घ्यावा, असा प्रस्ताव शेट्टी यांच्यासमोर ठेवला आहे. सध्याच्या घडीला शेट्टी यांची भूमिका महाआघाडीसाठी नकाराची आहे. त्यांच्याकडून शेट्टी यांना सोबत घेण्यासाठी शेवटच्या क्षणपर्यंत प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

Hatkangle Loksabha Constituency
Shelke Reply to Pawar : पवारांच्या इशाऱ्याला शेळकेंचे उत्तर; ‘असल्या घाणेरड्या राजकारणाची वेळ माझ्यावर अजून आली नाही'

दरम्यान, शेट्टी यांच्या सततच्या नकारामुळे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत आली नाही तर माजी आमदार सुजित मिणचेकर आणि माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीत सध्या माजी आमदार उल्हास पाटील, काँग्रेसचे गणपतराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे आणि सुजित मिणचेकर, शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांची ताकद महाविकास आघाडीकडे आहे.

राजू शेट्टी यांना सोबत घेऊन शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा वचपा काढण्याच्या तयारीत ठाकरे गट आहे. पण, राजू शेट्टी ऐनवेळी नकार देत असतील तर ठाकरे गटानेही सावध पावले उचलली आहेत. निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी यावर निर्णय घेऊन माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर किंवा माजी आमदार सुजित मिणचेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

Hatkangle Loksabha Constituency
Sharad Pawar : "मला 'शरद पवार' म्हणतात, माझ्या वाटेला गेला, तर...", पवारांचा शेळकेंना थेट इशारा

शेट्टींसाठी आग्रही; पण पक्षाचा आदेश आल्यास...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन महिन्यांपूर्वीच आम्हाला आदेश दिले आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेतल्यास हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण विजय मिळवू शकतो, अशी माहिती आम्ही पक्षप्रमुखांना दिली आहे. राजू शेट्टींना सोबत घेतल्यास शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीकडून आपल्याला मदत मिळेल, अशीही माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आहे. मात्र, शेट्टी यांचा महाविकास आघाडीत येण्यास नकार असेल तर आम्हाला पक्ष आदेश आला तर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली.

Edited By : Vijay Dudhale

R

Hatkangle Loksabha Constituency
PMC Budget 2024 : भाजपचे लोकसभा इलेक्शन बजेट आयुक्तांच्या पोतडीतून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com