Satara Political News : सातारा पालिकेत घरपट्टीवरून शिवेंद्रराजे आक्रमक; उदयनराजे उत्तर देणार...?

Shivendraraje Bhosale आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज हद्दवाढ भागातील नागरिकांसह सातारा पालिकेत जाऊन मुख्याधिकारी अभिजित बापट यांना जाब विचारला.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : सातारा पालिकेने हद्दवाढ भागातील नागरिकांना चुकीच्या पद्धतीने घरपट्टी आकारणी केली असून, ही वाढीव घरपट्टी रद्द करावी, या मागणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा पालिकेत धडक मारली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी याचे उत्तर द्यावे, असे ठणकावत याबाबत तातडीने निर्णय झाला नाही, तर येत्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून चुकीची बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी आज हद्दवाढ भागातील नागरिकांसह सातारा पालिकेत Satara Palika जाऊन मुख्याधिकारी अभिजित बापट यांना जाब विचारला. यासंदर्भात सातारा पालिकेने चुकीच्या पद्धतीने घरपट्टीची आकारणी केली आहे. यावरून शिवेंद्रराजे आक्रमक झाले होते. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागात चुकीच्या पद्धतीने घरपट्टी आकारणी झाली आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने त्या-त्या भागात कॅम्प लावावेत. तसेच नागरिकांचे प्रबोधन करावे व त्यानंतर जागेवरच घरपट्टी भरून घ्यावी, अशी सूचना केली होती.

मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. घरपट्टीसारखा महत्त्वाचा विषय असताना सातारा विकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक कुठे आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी याचे उत्तर द्यावे. Maharashtra Political News

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara Palika : उदयनराजे, शिवेंद्रराजेंच्या आघाडींपुढे 'महाविकास'चे आव्हान

आजपर्यंत या आघाडीच्या नेत्यांनी पालिकेला लुटले, त्यांनी उत्तर द्यावे. आलेली घरपट्टी रद्द करावी व योग्य पद्धतीने आकारणी करावी. या संदर्भात निर्णय झाला नाही, तर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून चुकीची बिले काढणाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By Umesh Bambare

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara News : उरमोडीचे पाणी पेटले : स्वाभिमानीचे कार्यकर्ते तापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com