दबाव टाकून संचालक झालेल्यांना घरी बसविण्याची वेळ...

यावेळच्या निवडणुकीत सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच आमदार मकरंद पाटील, शशीकांत शिंदे असे मिळून पॅनेल होत आहे. त्यामुळे बँकेच्या सभासदांच्या विश्वासावर या पॅनेलचा विजय होणार आहे.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

सातारा : जिल्हा बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच सभासदांनी मतदान करावे. केवळ जागा आडविण्यासाठी आणि सातारा जिल्हा बँक ही देशातील सहकारातील मोठी संस्था आहे. म्हणून मला तेथे गेले पाहिजे. यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच दिग्गज नेते अर्ज दाखल करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभागी असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आज अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्याशी सुरूची या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी संवाद साधला.

Shivendraraje Bhosale
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गेली पाच वर्षे सातारा जिल्हा बँकेत भाऊसाहेब महाराजांच्या नंतर संचालक व अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. गेली पाच वर्षे बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालले. देशात व राज्यात बँक कायम एक नंबरला राहिली आहे. यावेळच्या निवडणुकीत सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच आमदार मकरंद पाटील, शशीकांत शिंदे असे मिळून जे पॅनेल होत आहे. त्यामुळे बँकेच्या सभासदांच्या विश्वासावर आमच्या पॅनेलचा विजय होणार आहे.

Shivendraraje Bhosale
उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे समर्थक आमने-सामने; विकास कामांवरून श्रेयवाद रंगला....

कोणी किती टीका टिपण करू देत, कोणी काहीही करू देत, काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलचा विजय होणार आहे. बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच यावेळी सभासदांनी मतदान करावे, असे आवाहन करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, केवळ जागा आडविण्यासाठी आणि जिल्हा बँक देशातील सहकारातील मोठी संस्था आहे, म्हणून मला तेथे गेले पाहिजे. यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका त्यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली.

Shivendraraje Bhosale
सहकारातील चुकीच्या प्रवृत्तींवर कारवाई करा : अजित पवार

आता आम्हा सर्व इच्छुकांना अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. एकदा जागा वाटप झाल्यानंतर त्या त्या तालुक्यातील कोणाचे अर्ज ठेवायचे कोणाचे मागे घ्यायचे याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उदयनराजेंना घेऊन पॅनेल होणार काय, या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजेंचा निर्णय खासदार शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे करतील. मी त्यांचा निर्णय करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com