

Satara, 27 September : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण संस्था गटातून आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाष्य करण्यास नकार दिला.
दुसरीकडे, उदयनराजेंच्या अनुपस्थितीत भाजप नेत्यांची सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. खासदार भोसले यांनीही भाजप नेत्यांशी चर्चा न करता आपला उमेदवारी अर्ज जिल्हा बॅंकेसाठी भरला आहे का, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरून भाजपत काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत कुठलीच चर्चा कोणाबरोबरही झालेली नाही. त्यामुळे निवडणुकीबाबत मी आज तरी भाष्य करू शकत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील आणि राज्यातील एक नंबरची बँक आहे. ती शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे, त्यामुळे बँक चांगली चालली पाहिजे आणि टिकली पाहिजे. निवडणुकीबाबत जिल्ह्यातील प्रमुख बसून निर्णय घेतील, अशी अपेक्षा शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवली.
खासदार उदयनराजेंशी उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांची माझ्याशी किंवा माझी त्यांच्याशी किंवा अन्य कोणाशीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत मी भाष्य करू शकत नाही, असेही मंत्री शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.
उदयनराजेंचा हेतू चांगला : गोरे
खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीत राजकारण आणू नका. पक्षीय जोडे बाजूला ठेवा, असे आवाहन केले. त्याबाबत जयकुमार गोरे यांनी खासदार उदयनराजे यांचा हेतू खरंच चांगला आहे, असे सांगितले. पण, जिल्हा बॅंकेत काय चालते, हे सर्वांना माहिती आहे. नुकतीच प्रतीक्षा यादीवरील शंभर उमेदवारांना नोकरी देणे, काही जणांना बढती देणे, हे कसे चालते. ते बेकायदेशीर आहे, असे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.