Satara ZP Election : शिवेंद्रराजेंच्या शिलेदाराने शशिकांत शिंदेंकडून लावली फिल्डिंग; कुणबीचं गणित जमलं नाही तर प्लॅन B तयार?

Satara Political News : जावळी तालुक्यातील म्हसवे गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने वसंतराव मानकुमरे अडचणीत आले आहेत. कुणबी प्रमाणपत्रावर लढायचं की खर्शी-बारामुरे गणातून उतरण्याचा विचार सुरू आहे.
Vasantrao Mankumre
Vasantrao MankumreSarkarnama
Published on
Updated on
  1. वसंतराव मानकुमरे यांचा म्हसवे गट ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने त्यांची कोंडी झाली असून, ते कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत.

  2. जर गणित जमले नाही, तर ते खर्शी-बारामुरे गणातून उमेदवारी दाखल करू शकतात, यासाठी त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याची चर्चा आहे.

  3. खर्शी-बारामुरे गणात भाजप आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असून, महिलांसाठी राखीव म्हसवे गणात दोन्ही पक्षांच्या महिलांची स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.

भाऊसाहेब जंगम

Satara, 18 October : सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय वसंतराव मानकुमरे यांचा जावळी तालुक्यातील हक्काचा म्हसवे गट ओबीसीसाठी आरक्षित झाला आहे, त्यामुळे मानकुमरे पंचाईत झाली आहे. मात्र, त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असून त्या मार्गाने जायचं की नाही, याबाबत मानकुमरे गटात चलबिचल दिसून येत आहे.

कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली तर ओबीसी नाराज तर होणार नाहीत ना, याची काळजी त्यांना आहे. कुणबीच्या जोरावर गणित जमले नाही तर याच गटातील खर्शी-बारामुरे गणातून वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumre) हे निवडणूक लढवू शकतात, त्यासाठी त्यांनी आमदार शशिकांत शिंदेंची मुंबईत भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

म्हसवे गट नागरिकांच्‍या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. तर जावळी पंचायत समितीचे सभापतिपद खुले झाले आहे. त्याचवेळी म्हसवे गणात सर्वसाधारण महिला आणि म्हसवे गटांतर्गत येणारा खर्शी बारामुरे हा गण खुला झाला आहे. त्यामुळे कुणबी दाखल्याच्या जोरावर गणित जमले नाही, तर म्हसवे गटासाठी चर्चेत असलेले वसंतराव मानकुमरे खर्शी बारामुरे गणातून उतरले तर आश्चर्य वाटणार नाही. नुकतीच त्यांनी आमदार शशिकांत शिंदेची (Shashikant Shinde) मुंबईत घेतलेली भेट यासाठीच होती, अशाही चर्चा जावळी तालुक्यात होत आहे.

खर्शी बारामुरे गणात सर्वाधिक रस्सीखेच

महायुती व महाविकास आघाडीकडून या गणात सर्वाधिक रस्सीखेच होणार आहे. भाजपकडून जिल्हा सरचिटणीस श्रीहरी गोळे यांच्यासह माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, दत्ता गावडे, मिलिंद शिंदे, राजू गोळे स्पर्धेत आहेत. महाविकास आघाडीकडून विठ्ठल गोळे, गोपाळ बेलोशे, रामदास पार्टे, सुशील गोळे उमेदवारीसाठी आग्रही आहेत, तर रवींद्र गावडेंनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.

Vasantrao Mankumre
Aundh Politic's : गायत्रीदेवींच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी उमेदवाराला जयकुमार गोरेंच्या भावजय देणार टक्कर!

मी नाही तर सौभाग्‍यवती..

म्हसवे गण महिलेसाठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या दांड्या गुल झाल्या आहेत; पण मी नाहीतर माझ्या पत्नीला या न्यायाने अनेकांनी तयारी केली आहे. यामध्ये भाजपकडून माजी सभापती अरुणा शिर्के, भाजप पूर्वचे अध्यक्ष संदीप परामणे यांच्या पत्नी संजना परामणे, पूनम भालेघरे, रेश्मा पोफळे यांची नावे चर्चेत आहेत.

महाविकास आघाडीकडून वनिता महाडिक याही इच्छुक आहेत. आमदार शिंदेंचे गाव या गणात असल्याने हुमगाव किंवा कोलेवाडीमधील महिलेला इथून उमेदवारी जाहीर होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Vasantrao Mankumre
Satara Politic's : कुणबी दाखला वसंतराव मानकुमरेंना पुन्हा पाठविणार झेडपीत; शिवेंद्रराजे अन्‌ शशिकांत शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

Q1: म्हसवे गट कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे?
A1: म्हसवे गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित झाला आहे.

Q2: वसंतराव मानकुमरे कोणत्या मार्गाने निवडणूक लढवू शकतात?
A2: ते कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे किंवा खर्शी-बारामुरे गणातून लढण्याचा विचार करत आहेत.

Q3: खर्शी-बारामुरे गणात कोणत्या पक्षांमध्ये रस्सीखेच आहे?
A3: या गणात भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार स्पर्धा आहे.

Q4: म्हसवे गणात महिलांपैकी कोणत्या नावांची चर्चा आहे?
A4: भाजपकडून संजना परामणे, अरुणा शिर्के, पूनम भालेघरे, रेश्मा पोफळे आणि आघाडीकडून वनिता महाडिक यांच्या नावांची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com