Aundh Politic's : गायत्रीदेवींच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी उमेदवाराला जयकुमार गोरेंच्या भावजय देणार टक्कर!

Satara Zilla Parishad Election : सातारा जिल्हा परिषदेच्या औंध गटात ओबीसी महिला आरक्षण झाल्याने राष्ट्रवादीच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या बालेकिल्ल्यात उमेदवारीसाठी अंकुश गोरे आणि शेखर गोरे यांच्या पत्नींची चर्चा सुरू आहे.
Gayatri Devi- jaykumar Gore
Gayatri Devi- jaykumar Gore Sarkarnama
Published on
Updated on
  1. सातारा जिल्हा परिषदेचा औंध गट यंदा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाल्याने संपूर्ण राजकीय समीकरण पालटले आहे.

  2. औंध गट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींचा बालेकिल्ला असून, गायत्रीदेवी कोणत्या महिला उमेदवाराला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  3. मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे, तसेच शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे या मुख्य दावेदार असून, गायत्रीदेवींची भूमिका व जयकुमार गोरे यांचा निर्णय निर्णायक ठरणार आहे.

निहाल मणेर

Satara, 18 October : सातारा जिल्हा परिषदेच्या औंध गटातील निवडणूक यंदा राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे. औंध गट नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाला असून, औंध गट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. आता गायत्रीदेवी कोणत्या महिला उमेदवाराला संधी देणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरेंच्या पत्नीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच, शेखर गोरेंच्या पत्नीसाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत.

राष्ट्रवादीकडून औंध गटातून संदीप मांडवे व योगेश फडतरे, तर भाजपकडून डॉ. विवेक देशमुख हे प्रबळ उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र, आरक्षणामुळे संपूर्ण समीकरण बदलली आहेत. औंध (Aundh ) हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा गट मानला जातो, त्यामुळे सातारा जिल्ह्याचेही या गटाकडे लक्ष असते. याच गटातील पंचायत समितीचा औंध गण व सिद्धेश्वर-कुरोली गण खुले झाले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे गतिमान झाली आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचे बंधू अंकुश गोरे यांनी औंध गटात कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाल्याने सद्यपरिस्थितीत त्यांच्यासाठी अनुकूल आहे. त्यांच्या पत्नी भारती गोरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

औंध जिल्हा परिषद गटात शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांचाही लवाजमा मोठा आहे. शेखर गोरे यांनी त्यांच्या पत्नी सोनल गोरे यांची उमेदवारी जाहीर करावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या त्रिशंकू लढतीत गायत्रीदेवी कोणता उमेदवार देणार? मंत्री जयकुमार गोरे भाजपकडून कोणाची उमेदवारी निश्चित करतात, हे निर्णायक ठरणार आहे.

Gayatri Devi- jaykumar Gore
Satara Politic's : कुणबी दाखला वसंतराव मानकुमरेंना पुन्हा पाठविणार झेडपीत; शिवेंद्रराजे अन्‌ शशिकांत शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांना पंचायत समितीवरच समाधान मानावे लागेल, असेही सध्या औंध गणातील चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) पंचायत समितीसाठी औंध गणातून उद्योजक अमर देशमुख यांचे नाव पुढे येत आहे.

सिद्धेश्वर-कुरोली गणातून योगेश फडतरे किंवा भाजपचे डॉ. विवेक देशमुख यांना पंचायत समितीवर समाधान मानावे लागेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील राजकीय गणित गायत्रीदेवींच्या रणनीतीवर, अंकुश आणि शेखर गोरे गटाच्या ताकदीवर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्णायक भूमिकेवर अवलंबून आहे.

Gayatri Devi- jaykumar Gore
Umesh Patil : उमेश पाटलांचा राजन पाटलांना इशारा; ‘अनगरमध्ये माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पण लक्षात ठेवा तुम्हालाही नरखेड, मोहोळमध्ये यायचंय’

Q1: औंध गट कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे?
A1: औंध गट नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

Q2: औंध गटाचा पारंपरिक प्रभाव कोणाचा आहे?
A2: हा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींचा बालेकिल्ला मानला जातो.

Q3: मुख्य दावेदार कोण आहेत?
A3: अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे आणि शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे या प्रमुख उमेदवार आहेत.

Q4: या निवडणुकीत निर्णायक घटक कोण ठरणार आहे?
A4: गायत्रीदेवींची रणनीती आणि मंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका निवडणुकीचा निकाल ठरवेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com