Shivendrasinhraje Maratha Reservation : शेतात राबून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले ; आता राऊतांनी करावे 'हे' काम...

Satara BJP : शिवेंद्रसिंहराजेंनी जरांगेंचे अभिनंदन करत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करावे, असा दिला टोला.
Sanjay Raut, Shivendrasinghraje Bhosale
Sanjay Raut, Shivendrasinghraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

- उमेश भांबरे

Satara BJP News : या आधीच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. मात्र, आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तो न्याय मिळवून दिला आहे. मनोज जरांगे यांच्या या लढ्याला यश मिळाले असून यांचे मी अभिनंदन करतो, असे सांगून भाजपचे सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेतात राबून मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलं आता संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करावे, असा टोलाही लगावला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघाल्यानंतर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. आपल्या सुरुची या निवासस्थानी आपली भूमिका मांडताना म्हणाले, मी पहिल्यापासून सांगत होतो, हे सरकार मराठ्यांना आरक्षण देईल. मला विश्वास होता.

Sanjay Raut, Shivendrasinghraje Bhosale
Ujjwala Gas Scheme : उज्वला योजनेची महती सांगणा-यांना शेतकऱ्याने झाप झाप झापले !

या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होत. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात ते टिकल नाही. मात्र, या आधीच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. मात्र, आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तो न्याय मिळवून दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या लढ्याच्या यशाबद्दल मी जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शेतात राबण्यात कोणता कमीपणा... शेतात राबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देऊन दाखवलं आता संजय राऊतांनी मुखमंत्र्यांच अभिनंदन करावे.

(Edited by Amol Sutar)

Sanjay Raut, Shivendrasinghraje Bhosale
Shrikant Shinde Maratha Reservation : मुख्यमंत्री अन् टीमची अहोरात्र धडपड तर खासदार श्रीकांत शिंदे सांभाळत होते 'ही' मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com