Ujjwala Gas Scheme : उज्वला योजनेची महती सांगणा-यांना शेतकऱ्याने झाप झाप झापले !

Sharad Pawar : आडियो क्लिप झाली व्हायरल, शरद पवारांच्या जिल्हयाध्यक्षांनी सरकारला धारेवर धरले.
Ujjwala Gas Scheme
Ujjwala Gas SchemeSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीत 400 पारचा नारा भाजपनी दिलेला आहे. यासाठी मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजना सामान्यापर्यत कशा पोहोचवल्या. अन् त्याचा किती फायदा त्यांच्या जिवनात झाला, याबाबत जनजागृती करण्याचे काम भाजपाकडून मोठया प्रमाणावर केले जात आहे.

याला अनेक ठिकाणाहून विरोध होत आहे. भारत विकसीत संकल्प यात्रेत 'भारत सरकार' हा उल्लेख अपेक्षित असतांना त्याठिकाणी 'मोदी सरकार'ला प्राधान्य देण्यात आल्याने विदर्भातील अनेक गावांत या यात्रांना गावात अडवून बाहेर पाठविण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. आता लोकांना भ्रमणध्वनी करून उज्वला योजनेची महती सांगितली जात आहे.

Ujjwala Gas Scheme
Chandrapur Protocol Dispute : पत्रिकेवर रातोरात आमदार धोटेंऐवजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले, कसे काय?

अशाच एका प्रकारात उज्वला योजनेची महती सांगीत भाजपला पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारताच संतापलेल्या एका शेतक-याने शेतपिकाला मिळणारा हमीभाव व इतर मुदयावरून त्यांना असे काही सुनावले की, त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे चंद्रपूर जिल्हयाध्यक्ष राजेंद्र वैदय यांनी ही क्लिप व्हायरल केल्याने जिल्हयात याबाबतची चांगलीच चर्चा रंगत आहे.

एका शेतकऱ्याला भाजप कार्यालयातून भ्रमणध्वनी आला. सिलिंडरचे भाव आता कमी होणार आहेत. तुम्ही भाजपाला पाठिंबा देणारं काय, असा प्रश्न केला गेला. बियाणे खरेदी करण्यासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवलेत, दागिने सोडवण्याइतपतसुद्धा पीक झालं नाही. अशी खंत व्यक्त करतानाच त्या शेतकऱ्याने म्हटलं, चार दाणे टाकून शेतकर्यांचे पालनपोषण करतोय, असा गवगवा करण्यापेक्षा, शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या. त्यात आम्ही समाधानी आहोत. पुढे हा शेतकरी म्हणतो, जग पोट भरतयं तोच जगाचा पोशिंदा कुटुंबाचे पोट भरू शकत नाही. त्यामुळे गळफास घेतोय, ही लाजिरवाणी बाब आहे. शेतकऱ्याचा हा ऑडिओ समाजमाध्यमात तुफान व्हायरल होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com