Lok Sabha election 2024 : मोठी बातमी! राहुल गांधींचं ठरलं, अमेठी नाही तर...; काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Rahul Gandhi, Bhupesh Baghel : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचीही वर्णी
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Congress Political News : भाजपनंतर काँग्रेसनेही लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्यासह छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा समावेश असणार आहे. काँग्रेसने आपल्या 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसच्या या यादीत छत्तीसगडमधून सहा, कर्नाटकातून आठ, तेलंगणामधून चार तर केरळमधून सोळा, मेघालय दोन, सिक्कीम दोन, त्रिपुरा एक, नागालँड एक, लक्षदीप एक या प्रमाणे उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेस निवडणूक समितीची गुरुवारी केरळ, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि छत्तीसगडसह 10 राज्यांतील 60 उमेदवारांची नावे स्पष्ट करण्यासाठी बैठक झाली. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) शुक्रवारी 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत दक्षिण भारताची छाप दिसून येत आहे.

Rahul Gandhi
Maratha Reservation News : मराठा आरक्षणावर टांगती तलवार? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश

पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) केरळच्या वायनाडमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत, तर पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना राज्याच्या अलप्पुझामधून उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार शशी थरूर केरळच्या तिरुवनंतपुरममधून सलग चौथ्यांदा निवडणूक लढवणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi
BJP Vs Shivsena : ...अन्यथा 105 आमदार असूनही विरोधातच बसावं लागलं असतं; शिंदे गटाच्या नेत्याने फडणवीसांना सुनावलं

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना राजनांदगावमधून आणि माजी मंत्री तामरध्वज साहू यांना महासमुंदमधून उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. ज्योत्स्ना महंत छत्तीसगडच्या कोरबामधून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, भाजपच्या यादीनंतर काँग्रेसच्या पहिल्या यादीकडे देशाचे लक्ष लागले होते.

भाजपने गेल्या आठवड्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश मधील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून तर गृहमंत्री अमित शहा गुजरातमधील गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी प्रशासन अलर्ट, तब्बल 70 हजार कर्मचारी 'ऑन ड्युटी'; असे आहे प्लॅनिंग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com