Narayan Rane : नारायण राणे रामदास कदमांवर चिडले; म्हणाले, केसाने गळा कापणारे...

Ramdas Kadam : लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर असतानाच शिवसेना भाजपा नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.
Narayan Rane, Ramdas Kadam
Narayan Rane, Ramdas KadamSararnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर असतानाच शिवसेना भाजपा नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. विश्वासघात करत आमच्या केसाने गळा कापू नका, अशा शब्दात रामदास कदमांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे. या टीकेचा भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाचार घेतला आहे. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? अशा शब्दांत कदमांवर नारायण राणेंनी निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही चर्चेचा विषय ठरला आहे. आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे, त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल, अशा शब्दात रामदास कदमांवर (Ramdas Kadam) राणेंनी पलटवार केला.

Narayan Rane, Ramdas Kadam
Lok Sabha election 2024 : मोठी बातमी! राहुल गांधींचं ठरलं, अमेठी नाही तर...; काँग्रेसची पहिली यादी जाहीर

दरम्यान, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोकणात शनिवारी दापोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे कोणती भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे. तसेच शिवसेना नेते रामदास कदमही पुन्हा उद्या सभेत काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे. राणे यांनी केलेल्या टीकेला रामदास कदम शनिवारी होणाऱ्या जाहीर सभेत उत्तर देण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणातील जाहीर सभेला महत्त्व आले आहे.

Narayan Rane, Ramdas Kadam
Maratha Reservation News : कोंबडी चोर-कोंबडी चोर...; घोषणाबाजीसह मंत्री राणेंना दाखवले काळे झेंडे!

दरम्यान, रामदास कदमांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) सडेतोड उत्तर दिले होते. रामदासभाई कधी कधी ते टोकाचे बोलतात. मात्र त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की भाजपने शिवसेनेचा सन्मानच केलेला आहे. आम्ही 105 आहोत तरी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. महायुतीतील सर्व पक्षांना सन्मान देऊनच निवडणुकांना सामोरे चाललो आहोत. मात्र अनेक लोक वारंवार आमचे लक्ष वेधून घेण्यासाठी टोकाची भूमिका घेतात. आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्यांना गंभीरतेने घेऊ नये, असा टोला फडणवीसांनी कदमांना लगावला होता.

दरम्यान, जागावाटपावरून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत कलगीतुरा रंगला आहे. भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांचा हा वाद येत्या काही दिवसांत कोणत्या दिशेने जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Narayan Rane, Ramdas Kadam
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या पहिल्या यादीत असं साधलं 'सोशल इंजिनिअरिंग'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com