Satara Dcc Bank President : सातारा DCC बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत शिवेंद्रराजेंनी मांडली भूमिका; गोरेंचे ते मत खोडत सांगितला फॉर्म्युला...

Shivendrasinhraje Bhosale Satatement : सातारा डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निर्णयावरून भाजप नेत्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय सांगितला, तर शंभूराज देसाई आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी स्थानिक चर्चेवर भर दिला.
Satara Dcc Bank President Election
Satara Dcc Bank President ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 13 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत, असे विधान भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते. मात्र, अध्यक्षपदाचा फैसला सातारा जिल्ह्यात स्थानिक पातळीवर सर्वांशी चर्चा करूनच होईल, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले होते. त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही दुजोरा दिला आहे. जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी चर्चा करून अध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे, त्यामुळे गोरे आणि शिवेंद्रराजेंमधील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मांडलेल्या स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या भूमिकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दुजोरा दिला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेते म्हणून शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे आणि मी स्वतः एकत्र बसून चर्चेद्वारे अध्यक्षपदावर योग्य तोडगा काढू,असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.

स्थानिक पातळीवर एकमत न झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नमूद केले आहे. ही निवडणूक तीनही पक्षांनी एकत्र लढवली असल्याने, भाजपकडून कोण इच्छुक आहे आणि पाच वर्षांचा कार्यकाळ तीनही पक्षांत कसा वाटून घ्यायचा, याचा निर्णय लवकरच बैठकीअंती घेतला जाणार आहे.

दरम्यान, जावळीतील सध्याच्या राजकीय संघर्षाला शिवसेनेचे आतिश कदम जबाबदार असून, विजयी मिरवणुकीत राडा करण्यासाठी त्याच्या आकांनी फोन करून सांगितल्यानेच पुढील घटना घडल्याचा आरोपही त्यांनी केला.

Satara Dcc Bank President Election
Solapur Dcc Bank : कोर्टाने वाढविले मोहिते पाटील, माने, शिंदे, आवताडे, जगताप, हसापुरेंचे टेन्शन; दोन तास पाडला कायद्याचा किस, ‘या’ तारखेला निकाल...

माझ्या वडिलांपासून आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आमचे घराणे १९७८ पासून राजकारणात आहे. माझ्या वडिलांपासून आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, असे प्रयत्न करणारे संपले, आम्ही आजही त्याच ठिकाणी आहोत. गेली २० वर्षे मी आमदार आहे. आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीत दहशत किंवा दादागिरी केली नाही. मग बाहेरून काही लोक आल्यानंतरच अशा घटना का घडू लागल्या, याचा विचार विरोधकांनी करावा.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या कोणत्याही जल्लोषात मी सहभागी नव्हतो, तरीही माझे नाव घेऊन टीकाटिप्पणी करण्यात आली. पालकमंत्र्यांना आणून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे, असेही भोसले यांनी म्हटले आहे.

Satara Dcc Bank President Election
Solapur DCC Bank Election : डीसीसीच्या गेममधून म्हेत्रे आऊट; मोहिते पाटील, माने, जगताप, आवताडे, संजयमामा, हसापुरेंचा आज फैसला

आम्हाला वादविवाद किंवा संघर्ष करायचा नाही. महायुती म्हणून कोणी सोबत आले, तर एकत्र काम करण्याची आमची तयारी आहे. मात्र, जाणीवपूर्वक खोड्या काढल्या, विकासकामांच्या आड येण्याचा प्रयत्न केला, तर संघर्ष करण्याचीही आमची तयारी आहे, असा इशारा देत शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधकांना ठाम भूमिका स्पष्ट केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.