Shivendraraje Statement : पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या भाजप महिला नेत्याबाबत शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा....

Suvarna Narendra Patil Join NCP SP : भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारल्यानंतर सुवर्णा नरेंद्र पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल झाल्या. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दाव्यामुळे साताऱ्यात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.
shivendra raje bhosale-Suvarna Patil
shivendra raje bhosale-Suvarna Patil Sarkarnama
Published on
Updated on

भाजपची नगराध्यक्ष उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी (शरद पवार गट)मध्ये गेलेल्या सुवर्णा पाटील यांना तेथे न्याय मिळणार नाही आणि त्या पुन्हा भाजपात येतील, असा दावा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.

सातारा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या अनेक पट असल्याने काही कार्यकर्ते नाराज, तर अपक्ष कार्यकर्ते अर्ज मागे घेतील असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.

भाजपने अमोल मोहिते यांना उमेदवारी देत महायुतीतील आरपीआयसोबत जागा वाटप केले असून, साताऱ्यात सर्व जागा जिंकण्याचा विश्‍वास व्यक्त केला.

Satara, 20 November : सातारा नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारलेल्या भाजपच्या माहिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. मात्र, सुवर्णा पाटील यांच्याबाबत भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मोठा दावा केला आहे, त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ( Shivendrasinh Raje) यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहितेंसमवेत सर्व प्रभागातील उमेदवारांसह पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंनी उमेदवार निवडीपासून विविध विकास कामांची माहिती दिली.

नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडे उमेदवार नव्हता. नाराजीतून तिकडे गेलेल्या सुवर्णाताई पाटील यांना त्यांनी उमेदवारी दिली. ताई या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्या पुन्हा भाजपत (BJP) येतील, असा मला विश्‍वास आहे. कारण तेथे त्यांना न्याय मिळणार नाही, याची मला खात्री आहे, असेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यानी सांगितले.

खासदार उदयनराजे भोसले, नगरपालिकेतील प्रत्यक्ष जागा आणि इच्छुकांची संख्या पाचपट होती. माझा आणि शिवेंद्रसिंहराजेंचा कोणाला डावलण्याचा हेतू नव्हता आणि यापुढेही नाही. लोकांसाठी झटणाऱ्यांचे काम पाहून उमेदवारी दिली. साताऱ्यातच नव्हे; तर संपूर्ण जिल्ह्यात आपल्याला भाजपचा झेंडा फडकावयाचा आहे. त्यामुळे ज्यांना संधी मिळाली नाही. त्यांना कुठे ना कुठे तरी निश्‍चित संधी दिली जाईल. अपक्ष उमेदवार हे आमच्या विचाराचे असल्याने ते निश्‍चित अर्ज मागे घेतील.

भाजपकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या पाचपट होती. काहींनी नाराजीतून अर्ज भरले आहेत. त्यांना इतरत्र संधी देण्याचा प्रयत्न राहील. सुवर्णाताई पाटील या आमच्या पक्षातील राज्यस्तराव काम करणाऱ्या पदाधिकारी आहेत. त्यांना नगराध्यक्षपदासाठीची संधी मिळू शकली नाही. त्या नाराजीतून गेल्या असल्या तरी त्यांना तेथे न्याय मिळणार नाही. महाविकास आघाडीकडे उमेदवार नसल्यानेच त्यांनी ताईंना उमेदवारी दिल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

shivendra raje bhosale-Suvarna Patil
ShahajiBapu Vs Gore : जयकुमार गोरेंचा पलटवार; ‘शहाजीबापू, दुसऱ्याला दोष देताना आपण काय केलंय, हे बघितलं पाहिजे’

दरम्यान,मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांना पाठिंबा देण्यात आला. त्यावेळी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले जागा वाटपात भाजपसह महायुतीमधील आरपीआयला एक जागा दिली आहे. जे आमच्याकडे चर्चेसाठी आले, त्यांना आम्ही सामावून घेतले आहे. ज्यांनी चर्चा केली नाही (शिवसेना) त्यांना काय हवे काय नको, ते आम्हाला कसे समजणार असे सांगत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहोत. सर्वांच्या ताकदीवर भाजप सातारा पालिकेत सर्व जागा जिंकेल याचा मला विश्‍वास असून त्याबाबतचे चित्र उद्याच स्पष्ट होईल.

shivendra raje bhosale-Suvarna Patil
ShahajiBapu Vs Gore : जयकुमार गोरेंचा पलटवार; ‘शहाजीबापू, दुसऱ्याला दोष देताना आपण काय केलंय, हे बघितलं पाहिजे’

प्र.1 — सुवर्णा पाटील कोणत्या पक्षात गेल्या?
→ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात.

प्र.2 — भाजपकडून कोण नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत?
→ अमोल मोहिते.

प्र.3 — शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा दावा काय आहे?
→ सुवर्णा पाटील पुन्हा भाजपात परततील.

प्र.4 — साताऱ्यात अपक्ष उमेदवार काय करतील?
→ ते अर्ज मागे घेतील असा भाजपचा दावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com