Prakash Abitkar : 'भ्रष्टाचाराचा महामेरू, बिद्रीचा लुटारू'; आमदार आबिटकरांनी के पी पाटलांना डिवचले

Prakash Abitkar Criticized KP Patil : विधानसभेचे वारे वाहू लागल्याने के पी पाटील यांना निवडणुकीचे डोहाळे लागलेत. बिद्री कारखान्यामध्ये गेल्या 40 वर्षांत ते सर्वाधिक भ्रष्ट संचालक, चेअरमन आहेत, असा आरोप प्रकाश आबिटकरांनी यांनी केला.
Prakash Abitkar Criticized  KP Patil
Prakash Abitkar Criticized KP Patilsarkarnama
Published on
Updated on

Prakashrao Abitkar News : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. आबिटकर-पाटील यांच्या आरोपप्रत्यारोपांचा खेळ रंगत असून आमदार आबिटकरांनी के. पी. पाटील यांच्यावर बिद्री कारखान्याच्या साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

कारखान्याच्या सर्वच कामकाजामध्ये भ्रष्टाचाराचे महामेरू, बिद्री लुटारू म्हणून कारखान्याच्या इतिहासातील भ्रष्टाचारी चेअरमन असणाऱ्या के पी पाटील यांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवू नये, असा टोला आमदार प्रकाश आबिटकर यांनी लगावला. ते गारगोटी मध्ये बोलत होते.

विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या माजी आमदार के पी पाटील यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्यातील मागील पाच वर्षातील साहित्य खरेदीची माहिती जाहीर करावी. या खरेदीमध्ये 40% पेक्षा अधिकची तफावत असून बाजार मूल्य व इतर खाजगी कारखान्याची पेक्षा हा फरक कमी सिद्ध करावे, असे चॅलेंज आमदार आबिटकर यांनी के पी पाटील यांना दिले.

Prakash Abitkar Criticized  KP Patil
Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : 'फडणवीसांना थोडीतरी लाजलज्जा असेल तर...', पृथ्वीराज चव्हाण संतापले

विधानसभेचे वारे वाहू लागल्याने के पी पाटील यांना निवडणुकीचे डोहाळे लागलेत. बिद्री कारखान्यामध्ये गेल्या 40 वर्षांपासून ते संचालक, चेअरमन पदावर आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंबच बिद्री कारखान्याच्या खिळ्या-मोळ्यावर जगलेले आहे.

मागील पाच वर्षांच्या कालावधीतील कारखान्यांमध्ये केलेल्या खरेदीमध्ये बाजार मूल्य तसेच खासगी कारखान्यापेक्षाही 40% हुन अधिकची तफावत आहे. ही जर तफावत खरी नसेल तर त्यांनी तसे जाहीर करावे. ही खरेदी करताना पुणे, मुंबई येथील नेहमीच्या ठेकेदारांना काम दिले, असा आरोप अबिटकर यांनी केला.

आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघामध्ये कोणती भरीव कामे केलीत, हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणतेही विकासाचे मुद्दे नसलेला, मतदारसंघाचे व्हिजन नसलेल्या निष्क्रिय माजी आमदार के पी पाटील यांनी माझ्यावरील वैयक्तिक चिखल फेक बंद करून विकासाच्या मुद्द्यावर बोलावे. आम्ही त्याला उत्तर देण्यास समर्थ आहोत, असे खुले आव्हान आमदार आबिटकर यांनी के. पी. पाटील यांना दिले.

(Edited By Roshan More)

Prakash Abitkar Criticized  KP Patil
Nana Patole On Devendra Fadnavis : फडणवीसच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी; नाना पटोलेंनी इतिहासच सांगितला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com