Nana Patole On Devendra Fadnavis : फडणवीसच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी; नाना पटोलेंनी इतिहासच सांगितला

Nana Patole questioned Devendra Fadnavis on Maratha reservation : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीस आणि भाजप आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. 2014 मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने आरक्षण दिले होते. परंतु पुढे भाजप सरकारने त्याचे कायद्यात रुपांतर केले नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
Nana Patole On Devendra Fadnavis
Nana Patole On Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात मराठा आरक्षण खरा मारेकरी कोण, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले. याचा इतिहासाच पटोले यांनी मांडला. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच आहे.

मराठा आरक्षण रखडण्याचे पाप भाजप आणि फडणवीस यांनी केले. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर कोणी केले नाही आणि कोणत्या कारणामुळे झाले नाही, हे सांगून आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच आहे, असे नाना पटोले यांनी ठासून सांगितले.

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारने पेटवलाय. मराठा आरक्षण रखडवण्याचे पाप भाजप आणि फडणवीस यांचेच आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये काँग्रेस (Congress) आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. देवेंद्र फडणवीस त्यानंतर सत्तेत आले. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही. म्हणून ते आरक्षण गेले. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे देवेंद्र फडणवीसच आहे, असा घाणाघात नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला.

Nana Patole On Devendra Fadnavis
Ajit Pawar : मुंबईसाठी शिंदे-फडणवीसांचे देव पाण्यात; मात्र अजितदादांच्या निर्णयामुळे अडचण

देवेंद्र फडणवीस एवढं करून थांबले नाही. सत्तेत येताच, ती टिकवण्यासाठी विविध आकर्षक घोषणा केल्या. सत्तेत आल्यास मराठा (Maratha Reservation), धनगर, हलबा, यांच्यासह विविध जाती जमातींना आरक्षण देण्याचे आश्वासन 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी देऊन टाकले. आता या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांची आहे. तशी ती असतानाच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षांवर खापर फोडत सुटले आहेत. हे यांना कसे जमते, असा देखील सवाल नाना पटोले यांनी केला.

Nana Patole On Devendra Fadnavis
Video Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांनी अमित शहांना सुनावलं; म्हणाले, "कधीपर्यंत..."

मराठा आरक्षणावर विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी, असे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्र पक्ष नेहमी म्हणतात. पण यापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे. विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली आहे. आता निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारी आहे. पण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करताना दिसते. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, मग आरक्षण देण्यासाठी महायुतीला कोणी रोखले आहे. तत्काळ निर्णय घेऊन आरक्षणाचा तिढा सोडवला पाहिजे.

अदानीला कोट्यवधी रुपयांच्या जमिनी कवडीमोल दराने देताना विरोधकांना विचारता का? महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवताना विरोधकांना विचारले का? आरक्षणाचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा, यातून सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, असे देखील नाना पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com