Shivsena Politics : 'चंद्रहारसाठी राऊतांनी शिवसेनेची वाट लावली... ठाकरेही पॉलिश गदेवर भाळले' : सांगलीतील पदाधिकाऱ्यांची खदखद बाहेर

Sangli Shivsena UBT Angry On Sanjay Raut And Uddhav Thackeray : सांगलीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देखील ठाकरेंचे शिवबंधन तोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
Sanjay Raut, Uddhav Thackeray  And Chandrahar Patil
Sanjay Raut, Uddhav Thackeray And Chandrahar Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : नुकताच पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यावर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून पाटील यांच्यावर जोरदार टीका होत आहे. शिवाय पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या खासदार संजय राऊत यांनाही पक्षांतर्गत टीकेचा सामना करावा लागत आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगली मतदारसंघ मागून घेतला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांच्या उमेदवारीला अनेकांचा विरोध होता. मात्र ठाकरे आणि राऊतांनी आग्रहाने पाटील यांना उमेदवारी दिली. निकालात पाटील यांचा दारुण पराभव झाला. त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. आता याच चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे आणि राऊत यांच्यावर पक्षातूनच मोठी टीका होत आहे.

मिरज येथील सभेत चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चांदीची जुनी गदा पॉलिश करून दिली. त्याच गदेला ठाकरे भाळले. आता तरी ठाकरे यांनी राऊतांचे न ऐकता थेट लोकांत मिसळावे. वस्तुस्थिती समजून निर्णय घ्यावेत, असा सणसणीत टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी लगावला आहे. शिवाय फक्त चंद्रहारसाठी संजय राऊत यांनी सांगलीतील शिवसेनेची वाट लावली, ज्या चंद्रहारसाठी राऊतांनी इतका अट्टाहास केला आज तोच चंद्रहार पक्ष सोडून गेला. त्यामुळे राऊतांनी आता सर्वांची जाहीर माफी मागावी, अशीही मागणी दिगंबर जाधव यांनी केली आहे.

Sanjay Raut, Uddhav Thackeray  And Chandrahar Patil
Sanjay Raut on Chandrahar Patil : 'तर पैलवानाला पाच हजारही मतं मिळाली नसती...', शिंदेसेनेत प्रवेश करताच राऊतांनी जागा दाखवली

चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला आपल्यासह जिल्ह्यात अनेक मातब्बर नेत्यांनी विरोध केला होता. पण काय गौडबंगाल झाले देव जाणे. हा पैलवान 70 हजारांवर मते घेऊच शकत नाही, हे सांगून देखील ऐकले नाही. राऊत 4 दिवस सांगलीत त्यासाठी तळ ठोकून बसले. यामागचे सूत्रधार कोण होता? हेही लपलेलं नाही, मात्र पक्षाची नाचक्की झाली, नुकसान झाले. चंद्रहारकडे काय आहे? एकदा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेला पैलवान तालीम बांधतोय, मात्र त्या नावावर किती वाळू, खडी उपसली मोजायला हवी, अशी शंका जाधव यांनी व्यक्त केली.

Sanjay Raut, Uddhav Thackeray  And Chandrahar Patil
Chandrahar Patil: '...म्हणून चंद्रहार पाटलांनी ठाकरेंची साथ सोडली अन् शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला!'; 'या' मंत्र्यांचा मोठा दावा

वंचितच्या मार्गावर असणारे अन् भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सगळ्यांचे उंबरे झिजवून ते आले होते. आता ठाकरे त्यांना का भाळले, याचे उत्तर शोधावे लागेल. मात्र राऊतांनी केलेल्या या चुकीची माफी मागायलाच हवी, असेही ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांनी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना भेटायला बोलावले होते. त्यावेळी चंद्रहार त्या बैठकीला बसणार होता, राऊत त्यांना बोलावत होते. मात्र विशाल यांनी त्यांना हाकलले. चंद्रहारचा संबंध काय, असे विशाल म्हणाले होते, असा गौप्यस्फोट दिगंबर जाधव यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com