
Solapur, 14 August : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदारांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात आरोपांची राळ उठवली आहे. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षासाठी निवडणूक चोरली, असा आरोप गांधी यांनी केला आहे. एकीकडे राहुल गांधी हे निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक होत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघातील 17 हजार मतदारांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रश्न उपस्थित केला आहे.
लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंतच्या पाच महिन्यांत तब्बल 70 लाख मतदान कसे वाढले? तसेच मतदानाच्या निर्धारीत वेळेनंतरही झालेल्या मतदानाबाबत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एकाच व्यक्तीने चार राज्यात मतदान केल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. एकाच घरात शंभरपेक्षा जास्त मतदारांची नोंद दाखविण्यात आली आहे, असे अनेक प्रश्न गांधी यांनी विचारले आहेत.
राज्यातील वाढलेल्या मतदारांबाबत देशभरात चर्चा सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील मतदारांबाबतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) नेत्यानी आक्षेप नोंदविले आहेत. बार्शी विधानसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत सुमारे 17 हजार मतदार दुबार आणि मयत व्यक्तींची नावे तशीच ठेवण्यात आली आहे. त्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद वाणी यांनी केली आहे.
बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ते विधानसभा निवडणुकीपर्यंत पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये साधारणतः 17 हजार 214 दुबार मतदार आढळून आले आहेत. तसेच मयत मतदार यांची नावे कमी केलेली नाहीत. तसेच अठरा वर्षांखालील युवकांची नावेही मतदार यादीमध्ये स्थानिकांच्या मदतीने रहिवाशी दाखला देऊन वयाची व इतर कागदपत्रे बनावट तयार करून ऑनलाईन मतदार नोंदणी केल्याचे आढळून आले. या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यानी केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद वाणी यांनी विधानसभा मतदार यादी चौकशीचे निवेदन तहसीलदार एफ. आर. शेख यांना दिले आहे. आता सोलापूर निवडणूक शाखा याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या वेळी युवा सेना जिल्हा सचिव दीपक तिवाडी, युवा सेना विस्तारक ॲड. हेमंत रामगुडे, ॲड.पांडुरंग घोलप, अर्जुन सोनवणे, राहुल बुरसे उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.