Kolhapur News : आज लोकसभेच्या तिसऱ्या फेरीत राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 31.55 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया सुरु असताना कोल्हापुरातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध मतदाराचा मतदान रांगेतच मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)
उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभारलेले महादेव श्रीपती सुतार ( वय 69 , रा . उत्तरेश्वर पेठ , कोल्हापूर ) हे वृध्द चक्कर येऊन कोसळले. नातेवाईकांसह, कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले . मात्र , उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. (Lok Sabha Election 2024)
(राजकराणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे व्हाट्स अॅप चॅनेल फॉलो करा)
महादेव सुतार यांना दवाखान्यात हलवल्यावर मतदान (Voting) केंद्रावर मतदान पुन्हा सुरळीत झाली. मात्र या घटनेमुळे मतदार केंद्रावर काही काळ मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला होता. कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.