Abhijeet Patil : पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्यावर प्रथमच भाजप नेत्याची सभा; फडणवीसांसाठी अभिजित पाटलांचा पुढाकार

Devendra Fadnavis Sabha : अभिजित पाटील हे अगदी 26 एप्रिलपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रेही तेच बऱ्यापैकी हलवत होते.
Abhijeet Patil-Devendra Fadnavis-Vitthal sugar Factory
Abhijeet Patil-Devendra Fadnavis-Vitthal sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

Solapur, 4 April : गेले काही दिवसांपासून सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडीचे केंद्रबिंदू असलेले अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (ता. ५ मे) सभेचे आयोजन केले आहे. आमदार राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी ही सभा होणार आहे. विशेष म्हणजे विठ्ठल कारखान्यावर प्रथमच भाजप नेत्याची सभा होणार आहे.

अभिजित पाटील (Abhijeet Patil) हे अगदी 26 एप्रिलपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईपर्यंत सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रेही तेच बऱ्यापैकी हलवत होते. मात्र, शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यात असतानाच राज्य सहकारी बँकेने (शिखर) पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर (Vitthal Sugar Factory) जप्तीची कारवाई केली. त्यात कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली होती, त्यामुळे अभिजित पाटील हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhijeet Patil-Devendra Fadnavis-Vitthal sugar Factory
Vijaysingh Mohite Patil : 'शरद पवारांनी आपल्या चुका पदरात घेतल्या; आता...'

कारवाई होताच दुसऱ्या दिवशी अभिजित पाटील यांनी कारखान्याचे संचालक आणि प्रमुख पदधिकाऱ्यांशी बैठक घेतली होती. त्या बैठकीत अभिजित पाटील यांना निर्णय घेण्याचे स्वतंत्र देण्यात आले होते, त्यानुसार अभिजित पाटील यांनी सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या भेटीत फडणवीस आणि अभिजित पाटील यांच्यात चर्चा झाली. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला काखान्यासाठी मदत करतो, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले होते.

फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजित पाटील यांनी कारखान्यावर संचालक मंडळ, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना, तर माढा लोकसभा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. अभिजित पाटील यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर करतात पुण्यातील कर्ज वसुली लवादाने कानपिचक्या दिल्यानंतर राज्य सहकारी बँकेने कारवाई तातडीने मागे घेतली, त्यामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या अभिजीत पाटील यांना दिलासा मिळाला.

Abhijeet Patil-Devendra Fadnavis-Vitthal sugar Factory
Sharad Pawar's Interview : अजित पवारांंच्या पोटातलं आता ओठावर येत आहे; शरद पवारांनी ठेवलं मर्मावर बोट

आता त्याच अभिजित पाटील यांनी भाजपसाठी राजकीय मैदानात उडी घेतली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे विठ्ठल कारखान्यावर प्रथमच भाजपच्या नेत्याची सभा होणार आहे.

Abhijeet Patil-Devendra Fadnavis-Vitthal sugar Factory
Sharad Pawar's Interview : भाजपबरोबर गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेण्याचा विचारसुद्धा करत नाही; पवारांनी ठणकावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com