कर्जत ( जि. अहमदनगर ) : देशातील नागरिकीकरण वेगात वाढत आहे. त्यामुळे जमिनीचे महत्त्व खूप वाढले आहे. जमिनीच्या वादातून मारामाऱ्या, वाद, खून असे प्रकार घडत आहेत. मात्र देवस्थानच्या जमिनीच्या वादावरून चक्क प्रांत कार्यालयाच्या समोर गोळीबार करण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे घडला आहे. Shooting in front of the provincial office over a temple land dispute
रेहकुरी येथील कोकनाथ महादेव देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादामधून हा प्रकार घडला. कर्जत प्रांत कार्यालयाबाहेर संदीप छगन मांडगे याने रिव्हॉल्वर मधून हवेत गोळीबार केला. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्या संदीप मांडगे यास पोलिसांनी तात्काळ अटक केली.
याबाबत भरत नामदेव मांडगे (वय 45, रा. रेहकुरी, ता. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थानची 75 एकर जमिनी आहे. ही जमीन अनेक वर्षांपासून आमच्या भावकीतील चार कुटुंबे ही शेत जमीन करीत होते. कोकनाथ महादेव मंदिराची आम्ही देखभाल करीत होतो. परंतु आमच्या भावकीतील संदीप छगन मांडगे याने वरील चारही शेत गटाची देवस्थानाच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याच्या घरातील सर्व अध्यक्ष व सभासद केलेले आहेत. संदीप छगन मांडगे याने इतर दुसऱ्या भावकीतील लोकांचा काही एक संबंध नाही व इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी येथील उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे दावा दाखल केलेला आहे. त्यावरून मला व आमचे भावकीतील लोकांना काल (ता. 30) रोजी उप विभागीय दंडाधिकारी कर्जत येथे तारीख असल्याने मी व आमच्या भावकीतील बरीच मंडळी तारखेस आली होती.
तारीख झाल्यानतंर मी, शांतिलाल बाबू मांडगे (वय 60) रोहिदास खंडू मांडगे (वय 75), शहाजी बाबू मांडगे (वय 55), आश्रू यशवंत मांडगे (वय 70), भानुदास यशवंत मांडगे (वय 80), हरिभाऊ अण्णा मांडगे (वय 55), नारायण देवीदास मांडगे (वय 50), आप्पा गंगाराम मांडगे (वय 55), धनराज खंडू मांडगे (वय 50) सर्व रा. रेहकुरी, ता. कर्जत, जि. नगर असे आम्ही सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास येथील प्रांत कार्यालयाच्या गेटजवळ थांबलो होतो. त्यावेळी संदीप मांडगे, सचिन मांडगे तेथे आले. त्यावेळी माझा चुलत भाऊ शहाजी बाबू मांडगे याने त्याची मोटरसायकल मला घरी घेवून जाण्याचे सांगितल्याने मी ही मोटरसायकल घेवून घरी निघालो होतो. त्याचवेळी मला संदीप छगन मांडगे याने, तू मोटरसायकल घेवून जावू नको, खाली उतर असे म्हणून शिवीगाळ केली. दमदाटी करून मारहाण केली. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन झटापट झाली. या दरम्यान संदीप मांडगे याने त्याच्या कंबरेला लावलेली रिव्हॉल्वर काढून हवेत गोळीबार केला. त्यानतंर संदीप मांडगे हा तेथून निघून गेला.
याबाबत माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलिस अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळास भेट देऊन आरोपीस हत्यारासह ताब्यात घेतले. याबाबत इतरांचे जीवित धोक्यात येईल अशी कृती करणे आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. रिव्हॉल्वर आणि बुलेट(गोळ्या) जप्त करण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.