Gokul Milk Politics : गोकुळच्या सत्ताधाऱ्यासोबत शौमिका महाडिक, विरोधकांचा आवाज झाला थंड

Shoumika Mahadik : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा उद्या (ता.9) होणार आहे. पण त्याआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
Shoumika Mahadik
Shoumika MahadikSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत शौमिका महाडिक व्यासपीठावर सत्ताधाऱ्यांसोबत दिसण्याची शक्यता आहे.

  2. महाडिक आणि संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

  3. मात्र, गोकुळ दूध संघावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय भूमिका तीच राहील, असे शौमिका यांनी सांगितले होते.

  4. गोकुळच्या सभेत आता नवे समीकरण दिसण्याची शक्यता आहे.

  5. या घडामोडींमुळे कोल्हापूर सहकारी राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघावर 25 वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्या गटाची सत्ता होती. ती आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने खालसा केल्यानंतर महाडिक गटाला जबर धक्का बसला होता. गोकुळमध्ये संचालिका शौमिका महाडिक विरोधी बाकावर बसल्या होत्या. सुरुवातीच्या तीन ते चार वर्षांपासून गोकुळच्या कारभारावर टीकास्त्र सोडून वाबळे काढणाऱ्या संचालिका महाडिक त्यांची भूमिका महायुती सरकारनंतर मवाळ झालीय.

गोकुळच्या वार्षिक सभेत जाब विचारणाऱ्या संचालिका शौमिका महाडिक यावेळी मात्र सत्ताधाऱ्यांसोबत व्यासपीठावरच दिसण्याची शक्यता आहे. महाडिक यांची संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्याशी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पण गोकुळ दूध संघावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय आपली भूमिका तीच असल्याची माहिती यापूर्वी संचालिका शौमिका महाडिक यांनी दिली आहे.

Shoumika Mahadik
Gokul Milk Dairy : ‘गोकुळ’च्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी 50 हजारांचे एका ठरावधारकाला टोकन?; नेते हबकले, 150 कोटींचा चुराडा फिक्स!

‘गोकुळ’च्या चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक, दिवंगत पी. एन. पाटील, अरुण नरके यांच्या नेतृत्त्वाखालील सत्ता जाऊन मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, ‘जनसुराज्य’चे डॉ. विनय कोरे यांची सत्ता आली. त्यावेळच्या सत्तारूढ गटातून शौमिका महाडिक यांच्यासह डॉ. चेतन नरके, बाळासाहेब खाडे व अमरिषसिंह घाटगे हे विजयी झाले होते. पण राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि त्याचे पडसाद ‘गोकुळ’मध्येही उमटले. त्यातून आमदार सतेज पाटील वगळता सर्व महाडिक विरोधक भाजपसोबत आले. त्यातून महायुतीचा अध्यक्ष व्हावा म्हणून मंत्री मुश्रीफ यांचे पुत्र नविद यांची निवड झाली.

पण गेली चार वर्षे वासाचे दूध, ठेवी, काही संस्थांना दिला जाणारा जाणीवपूर्वक त्रास असे विषय घेऊन शौमिका महाडिक या सर्वसाधारण सभेत व्यासपीठावर न बसता सभासदांसोबत बसून जाब विचारत होत्या. आता राजकीय समीकरणे बदलली असल्याने अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी महायुती म्हणून सौ. महाडिक यांना व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले होते. संघाची ही सभा मंगळवारी आहे.

या पार्श्‍वभूमीवर शनिवार महाडिक यांची नविद मुश्रीफ यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील, बाळासाहेब खाडे आदी उपस्थित होते. या बैठकीत काही प्रश्‍नांवर महाडिक यांनी सहमती दर्शवली; पण अंतिम निर्णय झालेला नाही. सोमवारी दुपारी पुन्हा या सर्वांची एक बैठक होणार आहे. गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर महाडिक गटाच्या दूध उत्पादक सभासदांची बैठक शिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात झाली.

महायुती म्हणून आम्ही आता एकत्र आलो असलो, तरी माझे काही प्रश्‍न आहेत, त्याबाबत काल अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा झाली. मी समन्वयाच्या भूमिकेतच आहे, त्यामुळे वेगळी भूमिका घेणार नाही. तथापि ज्या संस्थांचे प्रश्‍न मी मांडले, त्यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय होईल, त्याची माहिती पत्रकार परिषदेत देऊ.’

- शौमिका महाडिक, संचालिका, गोकुळ दूध संघ

Shoumika Mahadik
Gokul Milk Dairy: महाडिकांची टीका मुश्रीफांवर, प्रत्युत्तर दिलं बंटी पाटलांनी...; मैत्रीचं गणित समझेना!

FAQs :

प्र.१: शौमिका महाडिक कोणत्या सभेत सहभागी होणार आहेत?
उ. गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत.

प्र.२: महाडिक यांचा सत्ताधाऱ्यांसोबतचा निर्णय कुठे झाला?
उ. गोकुळ अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासोबतच्या बैठकीत.

प्र.३: शौमिका महाडिक यांनी यापूर्वी कोणती अट घातली होती?
उ. गोकुळ दूध संघावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय भूमिका बदलणार नाही.

प्र.४: गोकुळ दूध संघ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उ. कोल्हापूर जिल्ह्यात.

प्र.५: या सभेच्या घडामोडींमुळे काय होण्याची शक्यता आहे?
उ. कोल्हापूर सहकारी राजकारणात नवे समीकरण दिसू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com