Maan : श्रीराम तुमच्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का... मिटकरींचा भाजपला सवाल

शिंदे सरकारने शंभर दिवसांत 100 days महाराष्ट्राचे Maharashtra मोठे नुकसान केलंय. राज्याचे मुख्यमंत्री CM Shinde सणवारात गुंतले आहेत. हे सरकार उपमुख्यमंत्री DyCM देवेंद्र फडणवीसच Devendra Fadanvis चालवतात.
Devendra Fadanvis, Amol Mitkari
Devendra Fadanvis, Amol Mitkarisarkarnama

गोंदवले : श्रीरामाच्या नावाने राज्य करण्याचा जे प्रयत्न करत आहेत, तेच दुसरीकडे श्रीरामाच्या नावाने जनतेची लूट करत आहेत, असा घणाघात करून श्रीराम तुमच्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप सरकारला केलाय.

राष्ट्रवादीच्या जनसंपर्क अभियानाच्या समारोप कार्यक्रमासाठी आमदार अमोल मेटकरी माण तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गट व भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. आमदार मिटकरी म्हणाले, ईडी पीडा टळो.. आणि भाजपचे राज्य जावो... अशी सध्याची अवस्था आहे. माझ्या घरावर ईडीने छापा टाकला तर माझ्याकडे तुकाराम गाथा, शिवचरित्र यासारखी सहा लाखांची पुस्तके सापडतील.

Devendra Fadanvis, Amol Mitkari
भाजप विरोधात कोणी उभा राहू नये, अशी व्यवस्था ते करू शकतात : पाटलांनी काढला चिमटा

शिंदे सरकारने शंभर दिवसांत महाराष्ट्राचे मोठे नुकसान केलंय. राज्याचे मुख्यमंत्री सणवारात गुंतले आहेत. हे सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवतात. त्यामुळे राज्याचे मोठे प्रकल्प गुजरातला गेले. शिंदे गट भाजपात विलीन व्हावा हीच फडणवीसांची इच्छा आहे. शिंदे गटाला मिळालेले बाळासाहेब हे नाव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नसून बाळासाहेब देवरस या आरएसएसच्या हाफचड्डीतल्या काळ्या टोपीवाल्या देवाचे नाव आहे, असंही श्री. मिटकरी यांनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com