मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या लटके यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे. पण अद्याप त्यांच्या पालिका सेवेच्या राजीनाम्याला मंजूरी मिळालेली नाही. मात्र दुसरीकडे लटके यांना शिंदे गटात घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिकीया दिली आहे.
"ज्याला उमेदवारी दिलेली आहे, साम, दाम, दंड, भेद वापरायचा आणि त्यालाच पळवायचा. आमदारांनाही सर्व मार्गांचा वापर करून पळवत आहेत. अंधेरी पूर्वमध्ये जे उमेदवार शिवसेनेने ठरवलंय, ते शंभर टक्के निवडून येतील. यातून महाराष्ट्राच्या जनमताची छोटीशी चाचणी होईल. अंधेरी मतदारसंघात मराठी मतदार मर्यादित आहे. बहुभाषिक हा मतदारसंघ आहे. तिकडचा निर्णय कसा येतो, हे पाहण्याची औत्सुकता असताना, दुसऱ्या पक्षाचा उमेदवार पळवायचा, हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडणारे नाही, असे पाटील म्हणाले.
भाजप हे असंच दुसऱ्यांचे उमेदवार पळवत राहिले. हे असंच सुरू राहिले तर यांच्याविरोधात कोणीही आपला उमेदवार उभे करणार नाही, अशी परिस्थिती हे निर्माण करू शकतात, असा चिमटाही पाटलांनी यावेळी काढला.
दरम्यान, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असल्याने राजीनाम्याशिवाय त्यांना ही पोटनिवडणूक लढवता येणार नाही. परंतु त्यांना निवडणूक लढवता येऊ नये, यासाठी राजकीय दबावामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.