Vishwajeet Kadam : विश्वजित कदमांनी सहा राज्यांतील नेत्यांना मतदारसंघात आणत फुंकले रणशिंग

Congress : सांगली जिल्हा व पलूस कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने कार्यकर्ता मेळावा...
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

अनिल कदम

Sangli News : आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. सांगली जिल्ह्यातील नेतेही कामाला लागले असून जिल्हा काँग्रेस व पलूस कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. कडेगावमध्ये झालेल्या या मेळाव्यात आमदार विश्वजित कदमांनी (Vishwajeet Kadam) सहा राज्यांतील नेत्यांना एकत्रित आणत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

मेळाव्यामध्ये काँग्रेसचे (Congress) नेते कन्हैया कुमार (Kanaiya Kumar), कर्नाटकचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री दिनेश गुंडूराव, अखिल भारतीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार मोहम्मद इम्रान प्रतापगडी, राजस्थानचे माजी मंत्री आमदार अशोक चांदना, उत्तराखंडचे आमदार भुवन कापरी, मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया हे नेते सहभागी झाले होते. तसेच आमदार सतेज पाटील, आमदार संजय जगताप, झिशान सिद्दीकी, एनएसयआयचे राज्याध्यक्ष आमीर शेख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, विजयमाला कदम, माजी आमदार मोहनराव कदम आदींची उपस्थिती होती.

Congress
Milind Deora : तथास्तु...! मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडताच काँग्रेसचा बडा नेता असं का म्हणाला?

मेळाव्यात बोलताना कन्हैया कुमार म्हणाले, मणिपूरमध्ये वारंवार हत्या होत आहेत. महिलांवर अत्याचार केला जात आहे. इतकी भयावह परिस्थिती असताना भाजप नेत्यांच्या तोंडातून मणिपूर या शब्दाचाही उल्लेख होत नाही. दुसरीकडे देशातील अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राहुल गांधी मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रा सुरू करीत आहेत. लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष करीत आहेत. या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सामील व्हावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला. आता महाराष्ट्रातही भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. कर्नाटकात यापूर्वी जनतेतून नव्हे, तर ऑपरेशन कमळ राबवून फोडाफोडीचे राजकारण करून भाजप सत्तेत आले होते, असे दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.

विश्वजित कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघासह जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. आता राज्यात शेतीसह शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक शिक्षित पिढी कडेगाव व पलूस तालुक्यांत दिसून येईल, यासाठी काम करणार आहे.

विश्वजित यांचे नाव 'दिल'जित हवे होते...

विश्वजित कदम यांचे नाव विश्वजितऐवजी ‘दिल’जित असते तरी चालले असते. कारण एखादी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आली की, त्यांचीच होते. विश्वजित कदम हा आपला मुलगा आता देशातील काँग्रेसचा मजबूत आधार बनला आहे, असे कौतुकोद्‌गार खासदार मोहम्मद इम्रान प्रतापगडी यांनी काढले.

(Edited By - Rajanand More)

Congress
Congress : काँग्रेसला डबल झटका; देवरांआधी मोठ्या नेत्यानं दिला पदाचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com