EVM Vs Paper Ballots: ..म्हणून राहुल गांधींवर भाजपने कारवाई केली; माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी स्पष्टचं सांगितलं...

अनेक देशांनी ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास सुरवात केली आहे.
Dr. Bhalchandra Mungekar
Dr. Bhalchandra MungekarSarkarnama
Published on
Updated on

EVMs Vs Paper Ballots देशाच्या राजकारणात अनेकदा ईव्हिएम मशीवर शंका उपस्थित केल्या जातात. इव्हिएम मशीन बंद करुन देशभरात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी कायम होत असते. यावर माजी खासदार अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी भाजपसह (BJP) सर्व विरोधी पक्षांचेही कान टोचले आहेत. (So BJP took action against Rahul Gandhi; Former MP Dr. Bhalchandra Mungekar made it clear)

सोलापुरातील एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांनी सातरस्ता येथील शासकीय निवासस्थानात पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने निवडणुका जिंकल्या की ईव्हीएमला दोष द्यायचा आणि हारल्या की काहीच बोलायचं नाही, ही दुटप्पी भूमिका योग्य नाही. निवडणुका जिंकणे किंवा हारणे हे महत्त्वाचे नाही. पण अनेक देशांनी ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास सुरवात केली आहे.

Dr. Bhalchandra Mungekar
Rajsthan Politics: काँग्रेसचे ग्रहण सुटेना; आता सचिन पायलटही वेगळ्या वाटेवर?

भारतातही ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरद्वारेच निवडणुका घ्याव्यात, असे मुणगेकर यांनी म्हटलं आहे. भाजपला भारतीय संविधानातले धर्मनिरपेक्ष आणि समतावादी हे शब्दच मान्य नाहीत. त्यामुळेच ते संविधान मोडण्याचे काम आहेत,आरोपही त्यांनी यावेळी केला.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधींनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्योगपती गौतम आदानींसंदर्भात प्रश्न विचारले. पण पंतप्रधान त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळेच राहुल गांधींवर कारवाई केली, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. राहुल गांधींच्या प्रश्नांनी पंतप्रधान मोदी घाबरले आहे. भारत जोडो यात्रेला मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहता त्यांना मनातून भीती वाटू लागली आहे, असेही मुणगेकर यांनी सांगितले.

भाजपने निवडणुकीसाठी हिंदू-मुस्लिम मुद्दा उचलून धरला आहे. पण हिंदू धर्म आणि हिंदुत्व वेगवेगळे आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या हिंदुत्वाची जी व्याख्या सांगत आहेत तीच व्याख्या योग्य आहे, असही डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी स्वातंत्र्यवीर मानत नाही. कारावासात राहिलेल्या इतर व्यक्तींना तुम्ही स्वातंत्र्यसैनिक म्हणता आणि सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणणे बरोबर नाही.सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी हाल, अपेष्टा सहन केल्या. पण त्यांच्यापेक्षाही जास्त हाल अपेष्टा, जीव अनेक स्वातंत्र्य सैनिकांनीही सहन केल्या, आपले जीवही गमावले. पण सावरकरांनीब्रिटिशांची माफी मागितली ही देखील वस्तुस्थिती आहे आणि राहुल गांधी देखील तीच वस्तुस्थिती सांगत आहेत. असही डॉ. मुणगेकर यांनी नमुद केलं.

Edited By - Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com