Solapur Bazar Samiti : देशमुख-कल्याणशेट्टींची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सोलापूर बाजार समितीसाठी 96.24 टक्के मतदान; उद्या दुपारी एकपर्यंत निकाल हाती घेणार

Solapur Bazar Samiti Voting : बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर भाजपमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. कल्याणशेट्टी यांच्या विरोधात भाजपचे दिग्गज दोन माजी मंत्री एकत्र आले होते. सुभाष देशमुख आणि विजय देशमुख एरव्ही एकमेकांशी बोलतही नसताना या निवडणुकीत मात्र दोघांनी मिळून कल्याणशेट्टींना जोरदार टक्कर दिली आहे.
Solapur Bazar Samiti Election Voting
Solapur Bazar Samiti Election VotingSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी (ता. 27 एप्रिल) अत्यंत चुरशीने 96.24 टक्के मतदान झाले. बाजार समितीच्या 5431 मतदारांपैकी 5227 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी उद्या (सोमवारी, ता 28 एप्रिल) सकाळी आठपासून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. दुपारी बारापर्यंत सर्व निकाल हाती येणार आहे. भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, याची जिल्ह्याला उत्सुकता आहे.

आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याशी हातमिळवणी बाजार समितीची निवडणूक लढवली आहे. त्यांना भाजपचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन आव्हान दिले आहे. देशमुखांच्या पॅनेलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बाळासाहेब शेळके यांनी साथ दिली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तुल्यबळ लढती पाहायला मिळाल्या.

बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर भाजपमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. कल्याणशेट्टी यांच्या विरोधात भाजपचे दिग्गज दोन माजी मंत्री एकत्र आले होते. सुभाष देशमुख आणि विजय देशमुख एरव्ही एकमेकांशी बोलतही नसताना या निवडणुकीत मात्र दोघांनी मिळून कल्याणशेट्टींना जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कुठल्याही पॅनेलचा विजय झाला तरी तो भारतीय भारतीय जनता पक्षाचा विजय आणि पराभव असणार आहे.

सोलापूर बाजार समितीच्या 18 जागांसाठी आज आठ मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. सर्वाधिक मतदान हे ग्रामपंचातय मतदारसंघात झाले असून सर्वात कमी हमाल तोलार मतदारसंघात मतदान झाले आहे. सोसायटी आणि ग्रामपंचायत मदारसंघात सर्वाधिक चुरस दिसून आली. विशेषतः ग्रामपंचायत मतदारसंघात लक्ष्मी दर्शनामुळे मोठ्या घडामोडीची शक्यता आहे. दुसरीकडे, सोसायटीमध्ये सत्ताधारी सेफ असल्याचे दिसून आले.

Solapur Bazar Samiti Election Voting
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात महत्वपूर्ण घडामोड आली पुढे; डॉक्टरांची म्युच्युअल फंडात 160 कोटींची गुंतवणूक;कोणाला मिळणार परतावा?

सोसायटी मतदारसंघात 1895 मतदारांपैकी 1864 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, यामध्ये 335 महिला, तर १५२१ पुरुषांनी मतदान केले आहे. या मतदारसंघात एकूण 98.36 टक्के एवढे मतदान झाले. सर्वाधिक शंभर टक्के मतदान हे तिऱ्हे मतदान केंद्रावर झाले, त्यापाठोपाठ सोलापूर मतदान केंद्रावर 99.40, नान्नज 98.90, निंबर्गीत 97.84, मंद्रूपमध्ये 96.37, आहेरवाडीत 99.13, वळसंग येथे 95.98 तर बोरामणी केंद्रात 98.06 टक्के मतदान झाले आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातील 1176 मतदारांपैकी 1160 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 663 महिला 497 पुरुष मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 98.64 टक्के मतदान झाले आहे. ग्रामपंचायत मतदार संघात नान्नज केंद्रावर सर्वाधिक चुरशीने 99.43 टक्के मतदान झाले आहे. त्या पाठोपाठ बोरामणीत 99.39, सोलापूर केंद्रावर 98.72, तिऱ्हे केंद्रात 98.29, निंबर्गीत 98.68, मंद्रूप येथे 97.71, आहेरवाडी 98.24, तर वळसंग केंद्रात 98.63 टक्के मतदान झाले आहे.

Solapur Bazar Samiti Election Voting
Solapur Bazar Samiti : माझ्या मुलाला मतदान केंद्रातून बाहेर काढतो का?; काँग्रेस अन्‌ भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर धावून गेले (Video)

व्यापारी मतदारसंघातील 1276 मतदारांपैकी 1203 मतदानाचा हक्क बजावला, यामध्ये 87 महिला, तर 1116 पुरुष मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात 94.28 टक्के मतदान झाले आहे. हमाल तोलार मतदारसंघातील 1084 मतदारांपैकी 1000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून 796 पुरुष मतदार तर 204 महिला मतदारांचा त्यामध्ये समावेश आहे. सर्वात कमी मतदानाची टक्केवारी याच मतदारसंघात नोंदवण्यात आले असून ती 92.25 टक्के आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com