BJP MLA Attack Case :‘गोळी घाल, पुढचं मी बघतो’; सोलापूरच्या भाजप आमदाराला संपवण्यासाठी ड्रायव्हरलाच ऑफर, मुख्य संशयित अखेर पोलिसांच्या हाती

Solapur BJP MLA Sachin Kalyanshetti Attack Case : सोलापुरात भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी चालकालाच पैशांचे आमिष दिल्याचे समोर आले आहे.
Solapur Crime News; bjp mla sachin kalyanshetti
Solapur Crime News; bjp mla sachin kalyanshettisarkarnama
Published on
Updated on

Solapur Crime News : अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवल्याच्या कथित प्रकरणात पोलिसांनी मुख्य संशयित श्रीशैल हुळे याला कोल्हापुरातून अटक केली आहे. सदर बाजार पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित प्रभाकर हनुमंत फुलारी याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्याची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे खासगी वाहनचालक आनंद स्वामीराव सुरवसे यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन संशयितांनी त्यांना आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यास सांगत पैशांचे आमिष दाखवले होते. “तुझ्या आमदार दादाला गोळी घालून खलास कर, पुढचं मी बघून घेतो,” अशा स्वरूपाची धमकी आणि कथित ऑफर दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

दोघांविरोधात गुन्हा; एकाला तातडीने अटक

या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रभाकर हनुमंत फुलारी आणि श्रीशैल हुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रभाकर फुलारी याला पोलिसांनी तातडीने अटक केली होती. एक दिवसाची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Solapur Crime News; bjp mla sachin kalyanshetti
Solapur Crime News : कमिशनच्या मलईसाठी शिंदे गटाच्या सोलापूर जिल्हाप्रमुखाकडून ठेकेदाराला मारहाण; खंडणीचा गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित श्रीशैल हुळे हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला होता. अखेर त्याला कोल्हापुरातून अटक करण्यात आली. त्यानंतर सदर बाजार पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने हुळे याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आमदारांच्या हत्येचा कट होता का?

या प्रकरणात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असला, तरी त्यांच्यावरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. पोलिस तपासातून या कथित ऑफरमागे नेमका कोणाचा हात होता, आमदार कल्याणशेट्टी यांना लक्ष्य करण्यामागे कोणता उद्देश होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास होणार आहे.

Solapur Crime News; bjp mla sachin kalyanshetti
BJP News : "तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल, पुढचं आम्ही बघून घेऊ" : सोलापुरातील भाजप आमदाराच्या हत्येची सुपारी

आमदारांच्या वाहनचालकाला थेट पैशांचे आमिष दाखवून आमदारांवर गोळीबार करण्यास सांगितल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता श्रीशैल हुळेच्या पोलिस कोठडीत चौकशीतून या कथित प्रकरणामागील आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com