Supriya Sule : अजितदादांच्या टीकेला सुळेंचं प्रत्युत्तर; थेट PM मोदींचा उल्लेख करत म्हणाल्या, "गडकरी आम्हाला मदत करतात पण..."

Supriya Sule On Ajit Pawar Statement : भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाला जाणाऱ्या 700 मीटर रस्त्याच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (ता.09) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सात तासांनी हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.
Supriya Sule during the protest at District Collector’s office demanding road work near Baneshwar temple in Bhor
Ajit Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 Apr : भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाला जाणाऱ्या 700 मीटर रस्त्याच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (ता.09) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सात तासांनी हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.

मात्र, या आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिल आहे. बनेश्वर येथील रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवारांना नो कॉमेंट्स म्हणत यावर उत्तर देणं टाळलं.

Supriya Sule during the protest at District Collector’s office demanding road work near Baneshwar temple in Bhor
Karad Politics : "सह्याद्री जिंकला म्हणजे..." : घोरपडेंनी एकाच वाक्यात बाळासाहेबांनी उधळलेल्या गुलालाचा रंगच उतरवला!

पण त्याच वेळेस हा रस्ता अवघा 600 मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर तो खासदार निधितून करता येऊ शकतो. असं म्हणत अजितदादांनी अप्रत्यक्षरीत्या सुप्रियाताईंना टोला लगावला. अजितदादांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणल्या, या देशातील सर्वच खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे की, आमचे मतदारसंघ 23 लाख लोकांनचे आहेत.

ज्या लोकसभा मतदारसंघाचे मी प्रतिनिधित्व करते त्या बारामती लोकसभा मतदारसंघात नऊ तालुके आणि 23 लाख मतदार आहेत आणि त्यासाठी फक्त 5 कोटींचा निधी खासदारांना मिळतो तो कशासाठीच पुरत नाही. खासदार निधीतून शाळांना, रस्त्यांना पैसे द्यायला पुरत नाही. त्यामुळे आम्ही अनेक खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे विनंती केली आहे की, मतदारसंघ मोठे झाले आहेत लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे आमचा खासदार फंड वाढवावा.

Supriya Sule during the protest at District Collector’s office demanding road work near Baneshwar temple in Bhor
Tanisha Bhise Death Case : "पैसे नकोत पण..."; तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी शिंदेंच्या शिवसेनेची 5 लाखांची आर्थिक मदत नाकारत केली मोठी मागणी

शहरातील एक नगरसेवक पाच कोटींचा पूल बांधतो त्यामुळे आम्हाला खासदार म्हणून पाच कोटींचा निधी पुरत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विस्तार पाहिल्यास 23 लाख लोक आणि नऊ तालुके या मतदारसंघातील लोणावळ्यानंतर आंबी गावापासून या मतदारसंघाची सुरुवात होते ते इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. तर दुसरीकडे साताऱ्यापासून नगरपर्यंत हा मतदारसंघ आहे.

त्यामुळे इतकी महागाई झाली आहे की, पाच कोटी रुपये लगेचच संपतात. केंद्रामध्ये आम्हाला रस्त्यांसाठी त्रास होत नाही. कारण केंद्रात नितीन गडकरी हे आम्हाला प्रचंड मदत करत असतात तसेच सी.आर पाटील देखील जलजीवन मिशनच्या माध्यमातून सहकार्य करत असतात. मात्र हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो. त्यामुळे पाच कोटींसारख्या एवढा कमी निधी कोणत्याच गोष्टीला पुरत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com