
Solapur, 20 May : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आरोग्याचे कारण देऊन काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदास नकार दिला आहे. तुम्ही कोणालाही संधी दिली, तर नव्या जिल्हाध्यक्षाला पक्षवाढीसाठी मी मदत करेन, असा शब्द म्हेत्रे यांनी दिला आहे. नव्या रक्ताला संधी देण्याच्या पक्षाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील सात ते आठ जणांची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली जाणार आहेत. त्यातून आगामी १५ दिवसांत सोलापूर काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळेल, अशी माहिती सोलापूर काँग्रेसचे प्रभारी मोहन जोशी यांनी दिली.
स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी प्रभारी मोहन जोशी (Mohan joshi) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जोशी यांनी संपूर्ण अकरा तालुक्यांचा दौरा करून काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तयारी करण्याची सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. निवडणुका आघाडी करून लढायच्या की स्वातंत्र्यपणे याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करावी, अशी सूचना केली आहे, असेही माजी आमदार जोशी यांनी नमूद केले.
दरम्यान, जिल्हाध्यक्षपदासाठी राजकुमार पवार, विजयकुमार हत्तुरे, अरविंद तात्या पाटील, देवानंद गुंड पाटील, नंदकुमार पवार, प्रतापराव जगताप, सातलिंग शटगार, विजय साळुंखे यांची नावे प्रदेश पातळीवर पाठविण्यात येणार आहेत. त्यातून येत्या पंधरा दिवसांत सोलापूर (Solapur) जिल्ह्याला नवा अध्यक्ष मिळेल, असा विश्वासही मोहन जोशी यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत असमर्थतता दर्शविली. माझ्या आरोग्यामुळे मी त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही, त्यामुळे तुम्ही कोणालाही जिल्हाध्यक्षपदी नेमा, नव्या जिल्हाध्यक्षाला पक्षवाढीच्या कामात माझे संपूर्ण सहकार्य राहील, असा शब्द दिल्याचे जोशींनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना जिल्हाध्यपदाबाबत कोणीही विचारणा केली नव्हती. गेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते मला भेटायलासुद्धा आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्षदासाठी विचारणा करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. मात्र, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला सक्षम आणि पक्षात नवचैतन्य निर्माण करणार जिल्हाध्यक्ष देण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीपासून मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला चार्ज करण्याचा प्रयत्न प्रभारी मोहन जोशी यांनी केला आहे. मागील दौऱ्यात त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत अपयशाने खचलेल्या संघटनेला सक्रीय करण्याचा प्रयत्न केला होता. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत कामाला लागण्याची सूचना केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.