

Solapur, 27 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक निकालात दुसरा विजय भाजपप्रणित सहकार विकास पॅनेलने नोंदविला आहे. सांगोला सहकारी विकास सोसायटी मतदारसंघातून सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. डॉ. देशमुख यांच्या विजयामुळे (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या दुसऱ्या पिढीची जिल्हा बॅंकेत एन्ट्री झाली आहे. यापूर्वी गणपतआबांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख यांनी जिल्हा बॅंकेत उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना सांगोला सोसायटी मतदारसंघातील एकूण 80 मतांपैकी 60 मते पडली आहेत. त्यांच्या विरोधातील मोहिते पाटील प्रणित स्वाभिमानी शेतकरी पॅनेलचे संजय इंगोले यांना 15 मते मिळाली आहेत, तर पाच मते बाद झाली आहेत. विजयानंतर आमदार देशमुख हे मतमोजणी कार्यालयात दाखल झाले होते.
सांगोला सोसायटी मतदारसंघातून आमदार डॉ बाबासाहेब देशमुख विजयी झाल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप सहकार विकास पॅनेलने पहिला विजय नोंदविला आहे. आमदार देशमुख यांनी तब्बल ४५ मतांनी विरोधातील संजय इंगोले यांच्यावर विजय मिळविला आहे.
सांगोला सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण सांगोल्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते संजय इंगवले यांनी आव्हान दिले होते. पण, आमदारांची बाजू भक्कम असूनही विरोधकांना चमत्काराची अपेक्षा होती. मात्र, मतदारांनी पुन्हा आमदार देशमुख यांच्या बाजूने कौल दिला आहे.
(स्व.) आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने सोलापूर जिल्हा बॅंकेत एन्ट्री केली आहे. डॉ. देशमुख यांच्यापूर्वी गणपतआबांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख यांनी जिल्हा बॅंकेत उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांनंतर आता गणपतआबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे जिल्हा बॅंकेत विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.