Jaykumar Gore : 'नाव गोरे, कारनामे काळे' म्हणत सोलापुरात महिला काँग्रेसकडून जयकुमार गोरेंच्या विरोधात आंदोलन

Solapur Women’s Congress Protest : आक्रमक महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जयकुमार गोरे यांची प्रतिकात्मक वेशभूषा केलेल्या एका व्यक्तीला साडीचोळीचा आहेर देत निषेध करण्यात आला आहे.
Solapur Congress
Solapur CongressSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 March : ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात सोलापूर महिला काँग्रेस आक्रमक झाली असून गोरे यांच्या विरोधात आज (ता. 07 मार्च) महिला काँग्रेसकडून निषध आंदोलन करण्यात आले. गोरे यांच्या विरोधात ‘नाव गोरे, कारनामे काळे’ अशा घोषणा देत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

सोलापूरच्या काँग्रेस भवनासमोर शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, शोभा बोबे, प्रा. संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी आदींसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेला नग्नावस्थेतील फोटो पाठविल्याचा आरोप आहे. मंत्री गोरे यांनी याचा इन्कार केला असून हे जुने प्रकरण आहे, त्या प्रकरणात माझी निर्दोष मुक्तता झाली आहे, असे गोरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि एका यू ट्यूब चॅनेलच्या विरोधात गोरे यांनी हक्कभंग दाखल केला आहे.

Solapur Congress
Solapur Shivsena : काँग्रेसच्या मुशीत घडलेल्या अन्‌ भाजपतून आलेल्या नेत्यावर शिंदेसेनेच्या सोलापूर शहरप्रमुखपदाची धुरा

आक्रमक महिला काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांनी जयकुमार गोरे यांची प्रतिकात्मक वेशभूषा केलेल्या एका व्यक्तीला साडीचोळीचा आहेर देत निषेध करण्यात आला आहे. तसेच गोरे यांचा विकृत असा उल्लेख करता त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

याबाबत शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे म्हणाल्या, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला नग्नावस्थेतील फोटो पाठवून आपली मानसिकता दाखवून दिली आहे. त्या संबंधित महिलेला त्रास देण्याचे काम गोरे यांच्याकडून झाले आहे. महिलेला त्रास देणाऱ्या जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. तसेच, महिलेला नग्नावस्थेतील फोटो पाठवणाऱ्या गोरे यांना सोलापूर महिला काँग्रेसकडून संपूर्ण कपड्याचा आहेर देण्यात आला आहे.

Solapur Congress
Basavraj Patil : बसवराज पाटलांच्या आमदारकीसाठी फडणवीसांच्या लाडक्या नेत्याने लावली फिल्डिंग; लिंगायत नेत्यालाही घेतले सोबत!

राज्यात महिला आणि मुली दिवसेंदिवस असुरक्षित होत आहेत. पूजा चव्हाणचा झालेला खून, बदलापूरच्या शाळेतील प्रकरण, स्वारगेट बलात्कार प्रकरण, करुणा मुंडे प्रकरण आणि खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार या सर्व घटना राज्यातील महिला असुरक्षित असल्याचे दाखविणाऱ्या आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्यामुळे महायुती सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीकाही महिला काँग्रेसकडून करण्यात आली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com