Ram Satpute: हेच हिंदूंना दहशतवादी म्हटलेले अन् आता..., सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल

Solapur Lok Sabha Election 2024: आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंना मालमत्तेचा हिशाेब देण्याचे आव्हान देताच, प्रणिती शिंदे यांनी सातपुतेंना प्रत्युत्तर दिलं होतं.
Ram Satpute-Praniti Shinde
Ram Satpute-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur Lok Sabha Election 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते (Ram Satpute) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यात लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेस आणि भाजपने अधिकृतपणे आपापल्या पक्षाकडून सातपुते आणि शिंदे यांची नावे जाहीर केली आहेत. उमेदवारी जाहीर होताच दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान, ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मंदिरांना भेटी देताहेत हे वीट आणणारं असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसंच काँग्रेसची सत्ता असताना यांनीच भगवा दहशतवाद हा शब्द आणल्याची टीकाही सातपुते यांनी केली आहे. सध्या या दोन्ही उमेदवारांमधील वाकयुद्ध पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

आमदार सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांना मालमत्तेचा हिशाेब देण्याचे आव्हान दिल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी सातपुतेंना प्रत्युत्तर दिलं. माझ्या वडिलांना काय बोलता? भिडायचं असेल तर माझ्याशी भिडा, असं वक्तव्य केलं आहे. प्रणिती शिंदेंच्या याच वक्तव्यावर राम सातपुते (Ram Satpute) म्हणाले, "आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू, सोलापुरातील (Solapur) तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, उद्योग आले पाहिजेत, आयटी पार्क झाले पाहिजेत, आमच्या सरकारच्या काळात सोलापूरला जोडणारे 40 हजार कोटींचे रस्ते तयार झाले. काँग्रेसने मागच्या 70 वर्षांत काहीच दिले नाही. त्यामुळं आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलूया, मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'बात निकलेगी तो दूर तक जायेगी'

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या मंदिर भेटीवरून सातपुते यांनी टीका केली. "मंदिराना विरोधकांनी भेटी देणं हे सॉफ्ट हिंदुत्व नसून डिसगस्टिंग प्रकार आहे. मुळात हिंदूंना (Hindu) दहशतवादी यांनीच म्हटलं होतं. मी विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार आहे. 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी', असं म्हणत सातपुते यांनी शिंदेना थेट इशाराच दिला.

Ram Satpute-Praniti Shinde
Mahavikas Aghadi Dispute : सोलापुरातही आघाडीत बिघाडी; 'सुशीलकुमार शिंदे शिवसेनेला मदत करतील, यावर विश्वास कसा ठेवायचा?'

हिंदूंना दहशतवादी आणि भगवा आतंकवाद म्हणणं हा यांचा खरा चेहरा असून, भगवा दहशतवाद म्हणणारे लोक आता भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या आमच्या संतांचे दर्शन घेत आहेत. पण इथले हिंदू त्यांचा खरा चेहरा जाणून आहेत. त्यामुळे आगामी काळात ते पूर्ण ताकदीने आमच्यासोबत असतील, असा विश्वासही सातपुते यांनी व्यक्त केला.

Ram Satpute-Praniti Shinde
Sharad Pawar: श्रीनिवास पाटलांची माघार, सातारचा उमेदवार कोण? पवारांनी सांगितली 'ही' चार नावं

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

सातपुते यांनी हिशाेब मागताच प्रणिती शिंदे म्हणाल्या, "सुशीलकुमार शिंदेसाहेब लोकांसाठी रात्रंदिवस काम करतात आणि तुम्ही त्यांना हिशाेब विचारता? यावरून तुमचे संस्कार कळतात. ज्यांना संस्कार दिले गेले नाहीत ते सर्व एकत्र आलेत. माझ्या विरोधात जे उभे आहे, त्यांना तुम्ही पार्सल म्हणता. मात्र, मी काही म्हणणार नाही. आता ते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर बोलत आहेत. अरे भिडायचे असेल तर माझ्याशी भिडा, मी निवडणुकीला उमेदवार म्हणून उभी आहे. माझ्या वडिलांना का बोलता?"

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com