Ram Satpute Property : 'ऊसतोड कामगाराचा मुलगा' म्हणवून घेणाऱ्या आमदार राम सातपुतेंची संपत्ती किती?

Lok Sabha Election 2024 : 14 लाख रुपयांची शेतजमीन आहे. तसेच 41 लाखांचे घर त्यांच्या नावावर आहे.
Ram Satpute Property
Ram Satpute PropertySarkarnama

Solapur News : मागील दोन टर्म भाजपचे खासदार असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि भाजपकडून राम सातपुते दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन तरुण उमेदवार आमने-सामने आहेत. या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी दणक्यात सुरु आहे. विशेष म्हणजे सातपुते यांच्याकडून मी ऊस तोड कामगाराचा मुलगा असा मुद्दा वारंवार समोर आणला जातो. तर विरोधकांचीही त्यांना त्यांच्या संपत्तीवरुन निशाणा साधला आहे. (Latets Marathi News)

सातपुतेंची एकूण संपत्ती -

आमदार राम सातपुते यांनी माळशिरस या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली होती. यावेळी त्यांनी आपली संपत्ती निवडणूक आयोगासमोर सादर केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute Property
Narayan Patil Resign Shivsena : मोहिते पाटलांनंतर माढ्यात महायुतीला आणखी एक धक्का; माजी आमदार पाटलांचा शिवसेनेचा राजीनामा

राम सातपुते यांच्याकडे एकूण 92 लाखांची संपत्ती आहे. यामध्ये जंगम आणि स्थावर अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे. सातपुते कुटुंबाजवळ 16 तोळे सोनेही आहे. तर बुलेटसह तीन दुचाकी वाहने आहेत. राम सातपुते यांच्याकडे 13 लाख आणि 13 हजार आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावरही काही मालमत्ता नोंद आहे. (Lok Sabha Election 2024)

Ram Satpute Property
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात
Ram Satpute Property
Bjp Vs Shivsena News : महायुतीचा उमेदवार ठरेना; संभाव्य उमेदवाराचे खोटे पत्र व्हायरल !

पत्नीच्या नावावर किती संपत्ती?

राम सातपुते (Ram Satpute) यांच्या पत्नीच्या नावावर जंगम मालमत्तेची नोंद आहे. त्यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता 24 लाख 30 हजार रुपये एवढी संपत्ती आहे. मांडवे या गावी 14 लाख रुपयांची शेतजमीन आहे. तसेच 41 लाखांचे घर त्यांच्या नावावर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com