Solapur Bazar Samiti Election: सोलापूर बाजार समितीचा बिगुल वाजणार; 27 एप्रिलला मतदान तर 28 ला मतमोजणी

Solapur Bazar Samiti News : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा सोलापूर जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी येत्या काही दिवसांत करण्याची शक्यता आहे. सोलापूर बाजार समितीवर मोहन निंबाळकर यांची तीन दिवसांपूर्वी प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे.
Solapur, Barshi Bazar Samiti Election
Solapur, Barshi Bazar Samiti ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तो प्राधिकरणाकडे पाठविला होता. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार येत्या मंगळवारपासून (ता. 25 मार्चपासून) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बाजार समितीसाठी 27 एप्रिल रोजी मतदान, तर 28 तारखेला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, यापूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेत 7 ऑक्टोबर 2024 पासून अर्जविक्रीला सुरुवात झाली होती. त्यादिवशी 181 अर्ज विक्री झाले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार हा दिवस आत्ता सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान ग्राह्य धरला जाणार आहे. या दिवशी विक्री झालेले अर्ज सध्या नव्याने सुरू झालेल्या प्रक्रियेत दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीची (Solapur Bazar Samiti) अधिकृत घोषणा सोलापूर जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी येत्या काही दिवसांत करण्याची शक्यता आहे. सोलापूर बाजार समितीवर मोहन निंबाळकर यांची तीन दिवसांपूर्वी प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यानंतर निवडणूक जाहीर झाल्याने ‘कार्यपूर्ती’ करण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली आहे. त्यात अधिकाऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यत सर्वांचा समावेश आहे.

Solapur, Barshi Bazar Samiti Election
Chandrashekhar Bawankule: महसूलमंत्री बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय; राज्यभरात राबवणार 'ही' मोहीम; जमीन व्यवहार करताना होणार मोठा फायदा

उमेदवारी अर्ज मंगळवारपासून (ता. 25 मार्च) शुक्रवारपर्यंत (ता. 28 मार्च) स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी एक एप्रिल रोजी होणार आहे, तर 2 एप्रिल रोजी पात्र उमेदवाराची यादी जाहीर केली जाणार आहे. 2 एप्रिलपासून 16 एप्रिलपर्यंत उमदेवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. माघारीनंतर 17 एप्रिल रोजी पात्र उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 27 एप्रिल रोजी मतदार होणार असून 28 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. बाजार समितीची निवडणूक (Election) अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपल्याने राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. सर्वच कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी सांगण्यात येईल. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत, यासाठी नेतेमंडळींना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

Solapur, Barshi Bazar Samiti Election
Solapur Crime : बीडच्या आका, खोक्याभाईनंतर सोलापुरात नाईन्ट्या; हवालदाराच्या अंगावर थुंकला, अधिकाऱ्याच्या छातीत मारला ठोसा...

उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर कार्यक्षेत्र असणाऱ्या बाजार समितीच्या एकूण अठरा संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये तब्बल 11 संचालक हे सहकारी संस्था मतदारसंघातून निवडले जाणार आहेत. त्यातील सात जागा खुल्या प्रवर्गासाठी, तर दोन महिला राखीव, एक जागा इतर मागासवर्गीय आणि एक जागा विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी असणार आहे.

ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागा असून त्यात दोन सर्वसाधारण, एक जागा अनुसूचित जाती/जमाती, तर एक जागा आर्थिक दुर्बल घटकांतून निवडली जाणार आहे. व्यापारी मतदारसंघातून दोन व हमाल तोलार मतदारसंघातून एक जागा निवडली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com