Solapur Crime : बीडच्या आका, खोक्याभाईनंतर सोलापुरात नाईन्ट्या; हवालदाराच्या अंगावर थुंकला, अधिकाऱ्याच्या छातीत मारला ठोसा...

Youth Assaulting police inspector : पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. त्यावेळी नाईन्ट्या याला रिक्षात घालून घेऊन जात असताना तो पोलिस हवालदाराच्या अंगावर थुंकला आणि त्यांना शिवीगाळ केली. पोलिस ठाण्यात आल्यानंतर उपचाराची यादी करत असताना तो पुन्हा हवालादारच्या अंगावर थुंकला.
Solapur police
Solapur policeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 March : महाराष्ट्रात काय चाललंय, असा प्रश्न पडावा, अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत. बीडमध्ये संतोष देशमुख खूनप्रकरणाच्या निमित्ताने भाजप आमदार सुरेश धस यांनी ‘आका’ हा शब्द प्रचलित केला. त्यानंतर धस यांच्या आष्टी-पाटोदा मतदारसंघातील सतीश भोसले ऊर्फ खोक्या भाई याचे कारनामे पुढे आले. आता सोलापुरात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या नाईन्ट्या नावाच्या तरुणाला समाजावून सांगणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. तसेच दोन दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या हिंसाचारात एका उपायुक्तावर कुऱ्हाडने वार करण्यात आले होते, त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संतोष देशमुख खून प्रकरण भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पहिल्यापासून लावून धरले. त्यांनी या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचे नाव न घेता सुरुवातीला ‘आका’ या नावाने त्याचा पाठपुरावा केला, त्यामुळे आका हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच परिचित झाला. त्यानंतर खुद्द सुरेश धस यांच्या मदारसंघातील त्यांच्या एका गुंड प्रवृत्तीच्या त्यांच्या कार्यकर्त्याचे गुन्हे पुढे आले.

आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या त्या तरुणाचे सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई असे नाव होते. त्याने शिकारीला अडथळा केला म्हणून दोघांना बेदम मारहाण केली होती. तसेच इतर गुन्हे खोक्यावर दाखल होते. हे प्रकरण उघउकीस आल्यानंतर तो कोलकत्त्याला पळून गेला होता, महाराष्ट्र पोलिसांनी तेथूल त्याच्या मुसक्या आवळल्या.

बीडमधील आका, खोक्यानंतर आता सोलापुरातील (Solapur) नाईन्ट्या पुढे आले आहे. त्याचे नाव ओंकार नलावडे ऊर्फ नाईन्ट्या (रा. सुंदराबाई डागा प्रशालेजवळ, दमाणी नगर, सोलापूर) असे आहे. हा नाईन्टया आणि त्याचे दोन ते तीन साथीदार यांच्यामध्ये भांडण सुरू होते. त्यावेळी ह्या नाईन्टयाने फुटपाथवर स्वतःचे डोके व तोंड आपटून घेतले, त्यामुळे ओंकार नलावडे तथा नाईन्ट्या याच्या डोक्यातून रक्त येत होते. हा प्रकार फौजदार चावडी पोलिस ठाण्यापासून जवळ असलेल्या रामलाल चौकात घडला.

Solapur police
Mohite Patil : रणजितसिंहांच्या मुलाच्या विवाहाला मोदी, शाहांचा शुभसंदेश; रिसेप्शनला फडणवीसांची हजेरी!

पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. त्यावेळी नाईन्ट्या याला रिक्षात घालून घेऊन जात असताना तो पोलिस हवालदाराच्या अंगावर थुंकला आणि त्यांना शिवीगाळ केली. पोलिस ठाण्यात आल्यानंतर उपचाराची यादी करत असताना तो ओंकार नलावडे हा पुन्हा हवालादारच्या अंगावर थुंकला.

दरम्यान, पोलिस ठाण्याच्या आवारात आरडाओरड करत असल्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी त्याला शांत राहण्यास सांगितले, त्या वेळी या नाईन्ट्याने पोलिस निरीक्षकांच्या छातीवर बुक्की मारली. या प्रकारात वरिष्ठ पोलिस निरीक्षक त्याला आडवत होते, त्या वेळी ओंकार याने त्यांना पुन्हा मारहाण केली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात ओंकार नलावडे ऊर्फ नाईन्ट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Solapur police
Mohite Patil Reception : अकलूजकडे पाठ फिरविणाऱ्या भाजप नेत्यांची मोहिते पाटलांच्या रिसेप्शनला आवर्जून हजेरी; अमित शाहांनीही पाठविला शुभसंदेश!

ओंकार नलावडे उर्फ नाईन्ट्या याच्याविरूद्ध दोन दिवसांपूर्वी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात एका महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याच गुन्ह्यात त्याला अटक केली असून तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com