Shiv Sena: राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेनं भाकरी फिरवली; तालुकाध्यक्षपदी आबा लांडे

Shiv Sena leader Aba Lande appointed as Mangalvedha Taluka Chief: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर आबा लांडे यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देत निवडणूक लढवण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Shiv Sena Mangalvedha
Shiv Sena Mangalvedha SarKarnama
Published on
Updated on

Mangalvedha News:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नोव्हेंबरच्या अखेर किंव जानेवारी घेण्याता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यात पक्षाअंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहे. मंगळवेढा शिवसेनेच्या तालुकाध्यक्षपदी आबा लांडे यांची निवड करून शिवसेनेने आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत.

मंगळवेढ्यातील राजकीय सत्ता भाजपच्या ताब्यात आहेत, अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर आबा लांडे यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देत निवडणूक लढवण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य कमी असले तरी शहरांमध्ये शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार हे शहराध्यक्ष असून त्यांना शहरातील राजकीय सामाजिक आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जाण आहे.

नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झाल्यामुळे त्यांच्या मातोश्री माधवी किल्लेदार या थेट नगराध्यक्षपदासाठी दावेदार मानल्या जात आहेत.शिवाय निवडणूक लढवण्याचा इरादा देखील नुकताच स्पष्ट केला. परंतु शिवसेने त्यांना ताकद दिल्यास ही निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते परंतु ग्रामीण भागात शिवसेनेच्या यापूर्वीच्या तालुकाध्यक्षाचा राजकीय प्रभाव अथवा गटबांधणी, पक्षसंघटना मजबूत करता आली नाही त्यामुळे कदाचित पक्षाने हा बदल केला असून आबा लांडे हा एक नवोदित युवक चेहरा असून तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण आहे.

Shiv Sena Mangalvedha
Sharad Pawar: शरद पवारांच्या सूचनांची फडणवीस सरकार दखल घेणार का?

शिवाय त्या प्रश्नावर तो आक्रमकपणे लढू शकतो असा हा चेहरा आहे. पंचायत समिती लक्ष्मी दहिवडी गटाचे आरक्षण सर्वसाधारण झाल्याने त्यांनी यापूर्वीच ह्या गणाची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना किती जागा युती करून लढवणार ही स्वबळावर लढणार हे स्पष्ट होणार आहे, शिवसेना जर स्वबळावर लढले तर कोणाच्यातरी पराभवाला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शिवसेनेला जागावाटप करताना सर्वच राजकीय पक्षांना विचारात घ्यावे लागणार आहे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या एका नाराज गटाने नुकतीच शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची सांगोल्यात भेट घेऊन निवडणुकी संदर्भात चर्चा केली होती त्यामुळे त्याचे शिवसेनेला पाठबळ मिळाले तर शिवसेनेची भूमिका निर्णायक टप्प्यावर येऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com