Solapur Politics : तुम्ही आता लावा, उद्या कर्मचारी तुम्हालाच 'मेस्मा' लावतील; माजी आमदार संतापले !

Mla Narsayya Adam : सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना इशारा आडम यांचा इशारा..
Solapur Politics : Narasayya Adam
Solapur Politics : Narasayya AdamSarkarnama
Published on
Updated on

Mesma act : राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी अत्यावश्यक सेवा म्हणजेच "मेस्मा" कायदा मंजूर करून घेतला आहे. याला सत्ताधारीच काय? विरोधी पक्षातल्या एकानेही यास विरोधच काय? चर्चा ही न करता मंजूर केला, ही लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळे तुम्ही आता "मेस्मा" लावा. येत्या निवडणुकीत कर्मचारी व शिक्षक तुम्हाला "मेस्मा" लावतील, असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम (Narasayya Adam) यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना दिला आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्गदर्शन करताना आमदार आडम बोलत होते. आडम यांनी एक लाख रुपयाचा लढा निधीही या संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला. ते म्हणाले, "आता राज्य शासनाच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. २०३५ पासून थोडा-थोडा आर्थिक भार पडणार असताना, समिती स्थापन करण्याचे नाटक कशासाठी करता. त्यासाठी तुम्ही जुनी पेन्शन योजना जाहीर करून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्या."

Solapur Politics : Narasayya Adam
Kapil Sibal News : केंद्र सरकारच्या विरोधात कपिल सिब्बल मैदानात; केली मोठी घोषणा

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची तरतूद असलेले मेस्मा (Maharashtra Essential Services Maintenance Act) विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. राज्यात सरकारी कर्माचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केल्याने अनेक कामे ठप्प पडली आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केल्याने त्यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्यासाठी घाईघाईने हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Solapur Politics : Narasayya Adam
Kisan Morcha Long march News : मोर्चेकऱ्यांशी गिरीश महाजन चर्चा करायला जाणार, तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू.

काय आहे मेस्मा कायदा?

मेस्मा कायदा म्हणजे “महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा”. (Maharashtra Essential Services Maintenance Act) नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो.लाचखोरी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणारा मोर्चा किंवा आंदोलनाला रोखण्यासाठी हा कायद्याची अंमलबजावणी केली जाते. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सरकारी कर्माचाऱ्यांनी संप पुकारला तर तो रोखण्यासाठी हा कायदा लावला जातो.

मेस्मा कायदा सुरु केल्यानंतर सहा आठवडे किंवा सहा महिन्यापर्यंत लागू केला जाऊ शकतो.सार्वजनिक आरोग्य क्षेत्र म्हणजे रुग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, अत्यावश्यक सेवा म्हणजे एसटी, वीजपुरवठा, शिक्षण क्षेत्र, अत्यावश्यक सेवा देणा-या कार्यालयामध्ये सामान्य नागरिकांच्या रोजची कामे असतात, या कामात खंड पडू नये, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा कायदा अंमलात अमंलात आणला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com