चार महिन्यांत अर्धे मंत्रिमंडळ गायब असेल, तर उरलेले रुग्णालयात असतील

ठाकरे सरकारने महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त मोहीम हाती घेतली आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

इस्लामपूर (जि. सांगली) : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे येत्या चार महिन्यांत ठाकरे सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये असेल, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज (ता. २८ सप्टेंबर) येथील वाघवाडी फाटा (ता. वाळवा) येथे दिला. भारत भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ नरेंद्र मोदींनी घेतली, पण ठाकरे सरकारने महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त मोहीम हाती घेतली आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेत आता मला जो प्रतिसाद मिळत आहे, ती क्रांतीची सुरुवात आहे, आम्ही आता हा संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. (Somaiya said In four months half cabinet disappear and remain will be in hospital)

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची तक्रार देण्यासाठी कोल्हापूर येथे जात असताना त्यांनी वाघवाडी फाटा येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माजी आमदार भगवानराव साळुंखे, रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते.

किरीट सोमय्या म्हणाले, "रस्त्यावर विविध ठिकाणी आणि रात्री-मध्यरात्री रस्त्यात कार्यकर्ते थांबून मला प्रतिसाद देत आहेत. ही क्रांतीची सुरुवात आहे. ठाकरे सरकार भ्रष्टाचारयुक्त आहे. त्यांचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा आमचा संकल्प आहे. या सरकारने खूप म्हणजे खूप नाटके केली. जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पोलिस ठाण्यात बंद करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे आणि सरकारचे बारा महिन्यांत आम्ही दोन डझन घोटाळे बाहेर काढले आहेत. चौकशी सुरू झाली आणि कारवाई सुरू झाली की हे कुठे तरी गायब होतात. अनिल देशमुखचांचा पत्ता कुणाला माहीत आहे का. फक्त ठाकरे आणि शरद पवारांना माहितीय, कारण त्यांनीच दोघांना लपवले आहे.

Kirit Somaiya
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर कसा दिला?

देशमुख गायब, मुंबईचे पोलिस आयुक्त फरार झाले, मुश्रीफ हॉस्पिटलमध्ये भरती झाले, आता हळूहळू चार महिन्यांत ठाकरे सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये असणार आहे. सगळे बदमाश आहेत, लुटारू आहेत. कोविडमध्ये सगळे जग धग सोशीत होते आणि हे पैसे मोजत होते. आज ११ वाजता माझी एका याचिकेवर सुनावणी होणार आहे. मी लाईव्ह सहभागी होणार आहे. ठाकरे यांनी त्यांचा मित्र, बिल्डर पार्टनरला मुलुंडची जागा हॉस्पिटल बनवण्यासाठी घेतली. ती जागा महाराष्ट्र सरकारची असून ५ ऑक्टोबरला ६५ कोटींमध्ये ती त्या बिल्डरला दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ६ ऑक्टोबरला तीच जागा २१०० कोटींमध्ये विकत घेण्याचा निर्णय ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेने घेतला. आम्ही तक्रार केली. लोकायुक्तमध्ये सुनावणी सुरू झाली आणि त्यानंतर सरकारने सांगितले की आम्ही हा निर्णय रद्द केला.’’

ते म्हणाले, ‘‘मी सांगितले, मी थांबणार नाही, जो निर्णय घेतलाय, त्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही त्यावर ठाम आहोत. साडेबारा कोटी जनता आमच्या पाठीशी आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीने दर्शन दिले तर माझे कुणी बिघडवू शकत नाही. म्हणून इथून निघालो आहे, मी तिला प्रार्थना करणार आहे, तू शक्तीची देवी आहेस, राक्षसांचा वध केलास. या भ्रष्ट सरकारचा वध करण्याची शक्ती मला दे."

Kirit Somaiya
मोदी, मल्ल्यासह राज्यातील बड्या नेत्यांची चौकशी करणाऱ्या ED अधिकाऱ्याची बदली

माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, सोमय्या यांनी आघाडी सरकारचा भ्रष्टाचार काढण्याचा यज्ञ सुरू केला आहे. त्यांच्या या मोहिमेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत." इस्लामपूर शहराध्यक्ष अशोकराव खोत यांनी स्वागत केले. भाजपचे वाळवा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com