Ajit Pawar : लाडक्या अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी अख्खी रात्र रस्त्यावर बसून काढली; दादांच्या आठवणींनी 84 वर्षांचे आजोबा गहिवरले

Balwant Patil News : ८४ वर्षीय बळवंत भिवाजी पाटील बारामती येथे रात्रभर थांबून अजितदादांचे अंतिम दर्शन घेतल्याची भावनिक कथा समोर आली असून त्यांच्या शब्दांतून नेत्यावरील निष्ठा आणि जनसामान्यांचे प्रेम व्यक्त झाले.
Ajit Pawar-Balwant Patil
Ajit Pawar-Balwant PatilSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 29 January : आपल्या लाडक्या अजितदादांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडताच संपूर्ण दिवस नर्व्हस गेला. काय करावं आणि काय नाही, अशी मनाची घालमेल सुरू झाली. आपल्या लाडक्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी बारामतीला जायचं असा निर्धार केला आणि दुपारी साडेबाराच्या सुमारास मंगळवेढ्यातून थेट बारामती गाठली. संपूर्ण रात्र रस्त्यावर बसून काढली आणि शेवटी अजितदादांचं अंतिम दर्शन घेतलं. अजितदादांच्या जाण्याच्या वेदना कोणत्या शब्दांत सांगू, अशा शब्दांत 84 वर्षांचे बळवंत भिवाजी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामतीजवळ विमान अपघातात बुधवारी (ता. 28 जानेवारी) सकाळी पावणे नऊच्या सुमारास मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली मृत्युमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. राज्यातील अजितदादाप्रेमींनी बुधवारी सकाळपासूनच बारामतीकडे धाव घ्यायला सुरुवात केली होती.

पवार कुटुंबीयांवर प्रेम कार्यकर्ते राज्यभर आहेत. अजितदादांच्या मृत्यूवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पण समोर दूरचित्रवाणीवर दृश्य दिसत होती. त्यामुळे मनाची घालमेल होत होती. मंगळवेढ्यातील (Mangalvedha) पाटील कुटुंबीयही पवार कुटुंबीयांवर निस्सीम प्रेम करणारे. 84 वर्षांच्या बळवंत भीवाजी पाटील यांच्या कानावर जेव्हा अजितदादांच्या मृत्यूची बातमी आली, तेव्हा ते प्रचंड अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थेतूनच बळवंत पाटील यांनी बारामतीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते थेट बारामतीत पोचले. संपूर्ण रात्र रस्त्यावर बसून काढली आणि आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले.

बळवंत पाटील यांचे कुटुंबीय पवार घराण्यावर श्रद्धा ठेवून राजकारण करणारे आहे. बळवंत पाटील यांचे बंधू (स्व.) प्रकाश भिवाजी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर त्यांची निस्सीम भक्ती होती. काँग्रेसमध्ये असताना पी. बी. पाटील यांच्यावर तालुक्यात पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी दिली होती.

Ajit Pawar-Balwant Patil
Ajit Pawar: अजितदादांची शेवटची इच्छा काय होती? जवळच्या सहकाऱ्यानं दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पवार कुटुंबीयांसोबत राहण्याची भूमिका मंगळवेढ्याच्या पाटील कुटुंबाने घेतली. त्यावेळी पी. बी. पाटील यांच्यावर राज्यस्तरावरची जबाबदारी देण्यात आली होती. पवारांकडे (स्व.) पी. बी. पाटील यांच्या शब्दाला किंमत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असताना पी. बी. पाटील यांचा पुण्याजवळ अपघाती मृत्यू झाला होता.

पी. बी. पाटील यांच्या मृत्यूमुळे झालेल्या आघातातून पाटील कुटुंबीय कसेबसे सावरले होते. मात्र, बुधवारी सकाळी घरात असतानाच अजितदादांच्या अपघाती मृत्यूची बातमी कानावर आली. ती ऐकताच पाटील कुटुंबीयांतील सर्वांत ज्येष्ठ असलेले 84 वर्षीय बळवंत पाटील यांना मोठा धक्का बसला. मनाची घालमेल उठली, त्यातून त्यांनी बारामतीला जाण्याचा निर्णय घेतला.

बारामतीला जाऊन अजितदादांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घ्यायचे, या दृष्टिकोनातूनच बारामतीकडे प्रस्थान ठेवले. रात्री साडेबाराच्या सुमारास मी बारामतीला पोहोचलो. संपूर्ण रात्र रस्त्यावर काढली आणि सकाळी दादांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले, हे सांगताना अजितदादांच्या आठवणींनी त्यांना गहिवरून आले.

Ajit Pawar-Balwant Patil
Ajit Pawar : ‘फक्त पुणेच नाही; तर 12 ही ZPत राष्ट्रवादीला मदत, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल’

पवार कुटुंबीयांचे पाटील कुटुंबावर फार मोठे उपकार आहेत. अजितदादा हे आमच्या कुटुंबाचे आणि तालुक्यात सर्व कार्यकर्त्यांचे आधारवड होते. अजितदादा जाण्याच्या वेदना मी कोणत्या शब्दांत सांगू. त्यांच्या जाण्यामुळे आमचे फार मोठे नुकसान झाले आहे,अशी भावना बळवंत पाटील यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com