Mangalvedha Politic's : मंगळवेढा नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच सुनंदा आवताडेंची मोठी घोषणा; ‘पती अन्‌ मुलाची मदत न घेता....’

Sunanda Autade Statement : राजकारणाशी पूर्वी संबंध नसतानाही मंगळवेढा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेल्या सुनंदा आवताडे यांनी स्वबळावर आणि स्वतंत्रपणे जबाबदारी पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला.
Sunanda Autade
Sunanda AutadeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 05 January : गेली 40 वर्षे माझा आणि राजकारणाशी काही संबंध नव्हता; तरीही नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी उभे राहिले. मंगळवेढा शहरातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम करत मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी मी माझ्या मुलाची आणि पतीची मदत न घेता यशस्वी करून दाखवेन, असा विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी बोलून दाखवून दिला.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष झालेल्या सुनंदा आवताडे (Sunanda Autade) यांनी आज (ता. ०५ जानेवारी) नगरपालिका कार्यालयात पदभार घेतला. त्यावेळी झालेल्या सत्कार समारंभानंतर आवताडे बोलत होत्या. आवताडे यांच्या या घोषणेने विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याचे मानले जात आहे.

नगराध्यक्षा सुनंदा आवताडे म्हणाल्या की, मंगळवेढा (Mangalvedha) शहरातील जनतेने दिलेली जबाबदारी मी आईच्या भूमिकेतून यशस्वीपणे पार पाडणार आहे. प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांमधील मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यास माझे प्राधान्य असणार आहे.

तीर्थक्षेत्र आघाडीचे नेते भगीरथ भालके म्हणाले, मंगळवेढा शहराच्या विकासासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनासाची पूर्तता करण्यासाठी सर्वानी एकदिलाने प्रयत्न करावेत. निधीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना भेटून पाठपुरावा करण्यात येईल.

Sunanda Autade
Pune Mahapalika : पुण्यात भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये तुफान राडा; कार्यकर्त्यांचीही धराधरी : एकमेकांचा प्रचार बंद, बॅनरवरील फोटो झाकला

या वेळी नगरसेवक सोमनाथ माळी यांनी शहरात संतसृष्टी उभारण्यासाठी पडीक शासकीय जागांचा वापर करावा, भूमिगत गटार, हद्दवाढ या प्रश्नाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.

जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके, अरूण किल्लेदार, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, नगरसेवक सोमनाथ माळी, प्रमोद सावजी, प्रशांत गायकवाड, अनिल बोदाडे, प्रीती सूर्यवंशी, विद्याराणी अवघडे, सीमा बुरजे, अश्विनी धोत्रे, नागर गोवे, रामचंद्र वाकडे, सिध्देश्वर आवताडे, सुशील आवताडे, प्रतिक किल्लेदार, संदीप फडतरे, कमालपाशा मुल्ला, महादेव धोत्रे, गणेश धोत्रे, आयाज शेख, यश नागणे, अजित यादव, आयेशा शेख आदी उपस्थित होते.

Sunanda Autade
Beed Municipal Corporation News : बीडमध्ये क्षीरसागरांचे मनोमिलन अशक्य, उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसलाच

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com