Ajit Pawar : ‘फक्त पुणेच नाही; तर 12 ही ZPत राष्ट्रवादीला मदत, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल’

Bhaskarrao Pere Patil : भास्करराव पेरे पाटील यांनी १२ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांना मदत करणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन करत कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्याचा संदेश दिला.
Bhaskarrao Pere Patil
Bhaskarrao Pere PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune, 29 January : फक्त पुणेच नाही, तर संपूर्ण 12 ही जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केली, तर तीच अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत पंचायत राज व्यवस्थेचे मार्गदर्शक भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खेड तालुक्यातील वराळे येथे आयोजित केलेल्या शोकसभेत पेरे पाटील बोलत होते. अजितदादांच्या जाण्याने जणू पूर्ण टीमच बाद झाली आहे, असे वाटते, असेही पेरे पाटील यांनी नमूद केले.

दिलीप मोहिते (Dilip Mohite) म्हणाले की, अजितदादा गुरुवारी (ता. २९ जानेवारी) खेड तालुक्यात प्रचारासाठी येणार होते. दादांच्या जाण्याने लाखो कार्यकर्त्यांची स्वप्न संपली आहेत. निधीबाबत दादा अतिशय दिलदार होते. कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी दादांनी कायम पाठिंबा दिला.

माजी सभापती शरद बुट्टे पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्याला अजितदादांच्या नावाने ओळख आहे. दादांनी केलेल्या कामाचे कधी प्रदर्शन केले नाही. मी विरोधी पक्षात असतानाही दादांनी माझी कामे केली. दादा इतका दिलदार नेता आजवर भेटला नाही. मला पद नाही मिळाले तरी चालेल; पण मी पुन्हा अजितदादांसोबत आलो, यातच माझं सार्थक झालं.

Bhaskarrao Pere Patil
Karad Politic's : शंभूराज देसाई, अतुल भोसले, उंडाळकरांची टाईट फिल्डिंग; ‘नॉट रिचेबल’ उमेदवार अखेर प्रकटले

माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे म्हणाले की, जिथं उभं राहायचं, तिथं प्रमाणिकपणे उभं राहायचं, हे अजितदादांनी शिकविले. अजितदादांमध्ये आम्ही नेता, भाऊ, मित्र आणि बाप पाहत होतो.

Bhaskarrao Pere Patil
Ajit Pawar Plane Crash: बारामतीत अजितदादांना मुखाग्नी दिला; तिकडे वरळीत पिंकी माळींना शेवटचा निरोप देण्यासाठी जमली गर्दी

अजितदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी पवार कुटुंबाच्या मागे उभे राहू अशी भावना यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी आजवर त्यांना अजितदादांच्या सोबतीत आलेले अनुभव आणि त्यांची काम करण्याची पद्धत याबाबतचे अनुभव व्यक्त केले. बहुतांश कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com