Udayanraje Bhosale News : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारचे आभार मानून अभिनंदन केले आहे. तर आता शेतकऱ्यांना पीक लागवडीच्या खर्चासह उत्पन्नाची हमी देणारी ‘इर्मा’ योजना अंमलात आणावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
खासदार उदयनराजेंनी Udayanraje Bhosale म्हटले, की शासकीय रुग्णालयातून Civil Hospital मोफत उपचार झाले पाहिजेत. तसेच राज्यातील गोरगरीब तसेच सर्वच लोकांना कोणताही भेदभाव न करता उपचार मिळायला पाहिजेत, या आमच्या मागणीला मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे यश आले आहे.
या निर्णयाबद्दल जनतेच्या वतीने तसेच डॉ. बुधाजीराव मुळीक आणि भूमाता परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाचे आम्ही अभिनंदन करतो.
राज्य सरकार वेगवान आणि धाडसी निर्णय घेत आहे. त्या बरोबरीने मोठ्या प्रमाणात लोकहिताच्या विकासकामांना निधी उपलब्ध करून देत आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के, आता गोरगरीब जनतेला शासकीय रुग्णालयातून मोफत उपचार हा राज्यातील ६० टक्के लोकसंख्येला लाभदायी ठरणार आहे. याच धरतीवर इर्मा योजना लागू करून शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Edited by : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.