Solapur News: सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, 'स्टार एअर'चा महिनाभरातच मोठा निर्णय,धक्कादायक कारणही आलं समोर

Solapur Mumbai air connectivity : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरमध्ये 2 ऑगस्ट रोजी विमानसेवा सुरु झाली होती. मात्र, त्यानंतर स्टार एअरने अवघ्या एका महिन्यातच सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोलापूरकरांना मोठा धक्का बसला आहे.
Solapur Air Service
Solapur Air Service Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News: मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली सोलापूर - मुंबई विमानसेवा एक महिन्यातच बंद पडली आहे. स्टार एअरकडून विमान कंपनीकडून गेल्या महिन्यात 2 ऑगस्टला सोलापूर- मुंबई विमानसेवा सुरु करण्यात आली होती. त्यापूर्वी 28 जून 2026 पासून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, आता स्टार एअर कंपनीनं सोलापूर-मुंबई अनिश्चित काळासाठी बंद करत असल्याची घोषणा केली आहे

स्टार एअर या कंपनीनं सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. मात्र,या निर्णयामागचं कारणही कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कमी प्रतिसाद आणि नाईट लँडिंग सुविधेचा अभाव असल्याचं जाहीर करत कंपनीने सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

स्टार एअरलाईन्स कंपनीनं या संदर्भात जिल्हा प्रशासनाला सध्यातरी एक महिन्यासाठी सोलापूर - मुंबई विमानाची उड्डाणं बंद करतं असल्याचं कळवलं आहे. कंपनीनं विमानसेवा बंद करण्यापाठीमागचं आणखी एक मोठं कारण म्हणजे विमानाच्या इंधनाचे वाढलेले दर हेही आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरमध्ये 2 ऑगस्ट रोजी विमानसेवा सुरु झाली होती. मात्र, त्यानंतर स्टार एअरने अवघ्या एका महिन्यातच सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोलापूरकरांना मोठा धक्का बसला आहे.

Solapur Air Service
Modi Government: मोठी राजकीय घडामोड; मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा, PM मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक, कुणाची खुर्ची धोक्यात?

आता सोलापूर- मुंबई विमानसेवेसंदर्भात येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या बैठकीत विमानसेवेबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलेलं आहे.

सोलापूर-मुंबई विमानसेवा वारवांर बंद पडत असल्याने प्रवाशांनामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पण दरवेळी काही ना काही कारणाने सेवा बंद पडते. सोलापूरहून प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी विमानसेवा हा सर्वात वेगवान पर्याय आहे. पण ही सेवा वारंवार कोलमडत असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

Solapur Air Service
Political Crisis : राजकीयदृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ; बॅलेट पेपरवर मतदान अन् उपसरपंचपद गेलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Solapur Dcc Bank-Devendra Fadnavis
Solapur Zilla Parishad-Deepak Vaidya
Karkamb Gram Panchayat Office
Solapur Air Service
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com