

New Delhi News: केंद्रातील मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.याचदरम्यान,राजधानी दिल्लीतून मोठी राजकीय अपडेट समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी(ता.6 सप्टेंबर)सायंकाळी राज्यमंत्री आणि महत्त्वाच्या मंत्रालयांच्या कामगिरीचा उच्चस्तरीय आढावा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत सरकारमधील विविध मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच संबंधित बैठकीत विशेषतः सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध मंत्रालये, मंत्री आणि त्यांच्या एकूण कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. विशेष म्हणजे या आढावा बैठकीसाठी विविध राज्यांच्या सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित मंत्रालयांचा कार्यभार असलेल्या काही निवडक राज्यमंत्र्यांना (MoS) आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे.
या बैठकीच्या नव्या बॉम्बेमुळे व पडद्यामागच्या एकंदरीत वेगवान राजकीय घडामोडींमुळे लवकरच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल किंवा विस्तार होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.मात्र,अद्यापतरी बैठकीसंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दिल्लीतील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील या बैठकींमध्ये सामाजिक न्याय, समाजकल्याण तसेच कृषी, शिक्षण आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यांतर्गत विकासकामांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणारे प्रगती अहवाल साद करण्याचे आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या या बैठकीमागचा व्यापक उद्देश निर्णयप्रक्रियेला अधिक गती देणे, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे आणि जनकल्याणाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यात होणारा विलंब कमी करणे, असा राहणार आहे.
मंत्र्यांच्या वैयक्तिक कामगिरीचे मूल्यमापन आणि संबंधित मंत्रालयांचे रिपोर्ट कार्ड हे आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळात बदल किंवा विस्तार करण्यासाठी महत्त्वाचे निकष ठरू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुढील काळात इतर मंत्रालये आणि मंत्र्यांच्या गटांसोबतही आढावा बैठका होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.