Yogesh Kadam : योगेश कदमांचे आव्हान ठाकरेंची शिवसेना पेलणार? कसं राखणार मंडणगड?

Nagarpanchayat Mandangad Shivsena Potitics : 'मंडणगड नगरपंचायतीवर लवकरच शिवसेनेचा भगवा फडकवू' असा दावा गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम यांनी केला होता. याचे हादरे आता नगरपंचायतीत दिसू लागले असून ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आव्हान पेलणार का? असा सवाल आता मंडणगडकर करताना दिसत आहेत.
Yogesh Kadam
Yogesh KadamSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : काही दिवसांपूर्वीच दापोलीतील पाच नगरसेवकांनी वेगळा गट करून गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला होता. यामुळे दापोली नगरपंचायतील राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच योगेश कदम यांनी आपला मोर्चा मंडणगड नगरपंचायतीकडे वळवताना येथेही ऑपरेशन टायगर केले जाईल असे संकेत दिले होते. त्यांनी 'मंडणगड नगरपंचायतीवर लवकरच शिवसेनेचा भगवा फडकवू' असा दावा केला होता. आता हे आव्हान येथे ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी पेलणार का हे पहावं लागणार आहे.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोलीतील पाच नगरसेवकांनी वेगळा गट करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी कदम यांनी आपल्यावर नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी अन्याय केला गेला. पण जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्याचे काम शिवसैनिकांनी केल्याचे म्हणत याचा वचपा आपण ऑपरेशन टायगरमधून काढू असे संकेत दिले होते.

तर उबाठाच्या पाचजणांनी शिंदे सेनेत प्रवेश करतानाच दापोलीचा पुढील नगराध्यक्ष शिवसेनेचाच होईल. दापोली शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच महायुतीच्या माध्यमातून शहराचा विकास केला जाईल ग्वाही कदम यांनी दिली होती.

यानंतरच त्यांनी आपला मोर्चा मंडणगड नगरपंचायतीकडे वळवला असून येथे भगवा फडकवू असा दावा केला होता. याची पूर्व तयारी म्हणून नगरसेवकांच्या स्वकीयांचा शिंदे सेनेत प्रवेश घडवून आणला. त्यांच्या या कृतीने लवकरच मंडणगड नगरपंचायतीत ऑपरेशन टायगर होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर आता याचे पडसाद मंडणगड नगरपंचायतीत उमटण्याची शक्यता आहे.

Yogesh Kadam
Yogesh Kadam On Mahayuti : आमदार योगेश कदमांचा खळबळजनक दावा; आरपीआय, महायुतीबाबत केले मोठं विधान

मंडणगड नगरपंचायतीतील ठाकरे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. येथे सध्या काठावरचे बहुमत असल्यानेच 'मंडणगड नगरपंचायतीवर लवकरच शिवसेनेचा भगवा फडकवू' असा दावा गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम यांनी केला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या हातून येथील ही सत्ता आता जाणार का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मंडणगड नगरपंचायतीचे विविध विषय समिती सभापती निवड समितीची निवडप्रक्रिया आज (ता. 21) होणार आहे. पण योगेश कदम यांच्या नगरपंचायतीवर भगवा फडकवण्याच्या घोषणेमुळे सध्या नगरसेवकांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे.

सध्या मंडणगड नगरपंचायतीत राज्यात सत्तेत असणारे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. येथे सत्तेत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेने सोबत येथे हाथ मिळवणी केली आहे. सध्या राष्ट्रवादीकडे नऊ विरुद्ध आठ असे काठावरचे बहुमत आहे.

Yogesh Kadam
‘भास्कर जाधव गुवाहाटीला यायला तयार होते’, शिंदेंच्या आमदाराचा दावा | Yogesh Kadam | Bhaskar Jadhav

नगरपंचायतीवर राजकीय फेरबदलांमुळे मोठा परिणाम झाला आहे. राजकीय फेरबदलांमुळे सत्ताधाऱ्यांनी देखील पाठ फिरवल्याने नगरपंचायतीची कामे ठप्प झाली आहेत. सत्ताधारी व विरोधक आपल्या वरिष्ठांच्या मदतीने विकासकामांना खो घाळण्याचे काम करतायत. ते दुजाभाव निर्माण करण्याचे प्रयत्न करतायत असा आरोप आता नगरसेवक करताना दिसत आहेत. तर निधी फक्त आम्हीच आणू शकतो असे जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी दोन्ही गटात स्पर्धाच लागलेली आहे.

दरम्यान आता निधीच्या असमान वाटपावरून नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विकासकामांच्या नावाखाली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने जो तो आपल्या राजकीय वाटचालीसाठी पक्षप्रवेशावर भर देत आहे. यात आता नवा गट स्थापन करण्याचा ट्रेंड तयार होताना दिसत असून नगरसेवक राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत.

Yogesh Kadam
Yogesh Kadam : '...तर यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव असू शकतं नाही' ; योगेश कदमांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

अशातच एकीकडे आता योगेश कदम यांच्या घोषणेमुळे मंडणगड नगरपंचायतीवर शिंदे सेनेचा भगवा फडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणात सत्तेचे वाटेकरी असणारे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जनतेचे हित लक्षात घेऊन राजकारण करणार का? की फक्त ठाकरेंना धक्का देण्यासाठी शिंदे सेनेच्या योगेश कदमांना राष्ट्रवादी काँग्रेस साथ सोडणार का ते आता पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com