Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा वाद तापला; आता कर्नाटकविरोधात टोकाचा संघर्ष होणार!

Irrigation Federation : आलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवण्यासाठी कर्नाटक सरकर वचनबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घोषणा केली आहे. यामुळे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
Almatti Dam
Almatti Dam
Published on
Updated on

Sangli News : कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याची जोरदार तयारी केली असून आता केंद्र सरकरची परवानगीसाठी देखील दबाव वाढवला जातोय. अशातच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी देखील आलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवण्यासाठी कर्नाटक सरकर वचनबद्ध असल्याचे सांगत कर्नाटकची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा हा वाद वाढण्याची शक्यता असून राज्य इरिगेशन फेडरेशनचे टोकाच्या संघर्षाला आपणही तयार असल्याचे सांगितले आहे.

आलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढवण्यासाठी कर्नाटक सरकर केंद्राच्या परवानगीसाठी थांबले आहे. पण सरकारकडून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी भूसंपादन प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली आहे. तसेच बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा एक गट केंद्रीय जलमंत्री पाटील यांची भेट घेणार आहे.

यावेळी केंद्र सरकारने 2010 च्या कृष्णा जल न्यायाधिकरणाच्या निकालानुसार राजपत्र अधिसूचना जारी करण्याची मागणी केली जाणार आहे. यावेळी आलमट्टी धरणाची उंचीबाबतची आग्रह केला जाऊ शकतो. यामुळे एकीकडे कर्नाटक सरकार आलमट्टी धरणाबाबत केंद्रापर्यंत उडी गेत असताना महाराष्ट्र सरकारकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने सांगलीसह कोल्हापुरमधील जनतेतं नाराजी आहे.

Almatti Dam
Almatti Dam : ‘आलमट्टी’बाबत कर्नाटकची भूमिका ‘झुकेगा नई साला’; महाराष्ट्राचा विरोध डावलून घेतला मोठा निर्णय

अशातच आता राज्य इरिगेशन फेडरेशनचे केंद्राने जर आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्राला डावलून निर्णय घेतल्यास टोकाच्या संघर्ष होईल असा इशारा दिला आहे. फेडरेशनचे संपर्कप्रमुख विक्रांत पाटील-किणीकर यांनी कर्नाटकला आणि केंद्राला याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी या धरणाच्या उंचीविरोधात जिल्ह्यातील शेतकरी, पूरबाधित लोक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा रविवारी (ता. 11) दुपारी एक वाजता छत्रपती शाहू मार्केट यार्ड येथील मल्टिपर्पज हॉल येथे मेळावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाने यास मान्यता दिली आहे. लवकरच केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कर्नाटक सरकारने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

2019 व 2021 च्या महापुरामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. या पुरास आलमट्टी धरण हे महत्त्वाचे कारण आहे. या पुरामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील शेती पिके, उद्योग, लहान मोठे कारखानदार, दुकानदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मनुष्य व जनावरांचीही हानी झाली होती. इतके होऊन ही कर्नाटक सरकारला याचे गांभीर्य नाही. त्यातच पुन्हा उंची वाढविण्याचा घाट घातला जात असल्याचा दावाही किणीकर यांनी केला आहे.

Almatti Dam
Almatti Dam : ‘अलमट्टी’ उंची वाढी विरोधात जोरदार वाढला; सांगलीतून लोकप्रतिनिधींनी फुंकले रणशिंग

त्यांनी विरोध करण्यासाठी रविवारी (ता. 11) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह आजी-माजी खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, ग्रेन मर्चंट असोसिएशन, कोल्हापूर धान्य व्यापारी संघटना, आंदोलन अंकुश, सहकारी पाणीपुरवठा संस्था प्रतिनिधी, पूरबाधित शेतकरी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा व धोरण ठरविण्यात येणार असल्याचेही ते म्हणालेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com