PMC Garbage Scam : 'कचऱ्या'तून शेकडो कोटींची 'ठेकेदारी' करणारा पुण्यातला माजी आमदार कोण ?

Pune MLA Fraud News : 'याबाबतचे सारे पुरावे आणि झेरॉक्स ‘सरकारनामा’कडे उपलब्ध झाले आहेत."
PMC Garbage Scam
PMC Garbage ScamSarkarnama

Pune News : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पैसा लागतो. पण याच कचऱ्यातून पैशांचीच विल्हे‘वाट’ लावली जाते. ती कशी? कोण लावते? याचा शोध घेण्यासाठी एका पुणेकराने तब्बल लाख रुपयांची पदरमोड करून ‘झेरॉक्स’ काढले आहेत. गंभीर बाब म्हणजे, महापालिका आणि राज्यातील सत्तेत सामील एका माजी आमदाराच्या (आपल्या कुटुंबियांसाठी घेतलेल्या ठेक्यांची) निकटवर्तीय ठेकेदारांची माहिती मिळविण्यासाठी एका पुणेकराने हे धाडस केले आहे. त्यातून या माजी आमदाराने कचऱ्यातून पैशांची कमाई केली, हे उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतचे सारे पुरावे आणि झेरॉक्स ‘सरकारनामा’कडे उपलब्ध झाले आहेत. (Latest Marathi News)

PMC Garbage Scam
Rahul Gandhi News : राहुल गांधी खरंच 'गांधी' आहेत का ? शरद पोक्षेंच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले...

पुण्यातील कचरा प्रकल्प, त्यांचा उद्देश, त्यावरचा खर्च, ठेकेदार कोण ? ठराविक कामे वर्षाकाठी एकाच ठेकेदाराला कशी दिली गेली? बायोमायनिंगचे काम झाले नसतानाही बिले कशी काढली, या कामांचा निधी का वाढवला, यामागे कोणत्या राजकारण्याने दबाव आणला, त्यांच्या नातेवाइकांना किती कोटी रुपयांचे कामे मिळाली, याचा तपशील या झेरॉक्समधून हाती आला आहे. कचऱ्याच्या ठेकेदारीत पुणे महापालिकेत मोजक्याच तेही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘हात ओले’ झाल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पैशांतून कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली कशी लूट केली जाते, हेही यानिमित्ताने उघड आहे.

पुणे शहरात आजघडीला रोज सव्वादोन हजार टनापेक्षा अधिक कचरा जमा होतो. त्यातील दीड ते पावणेदोन हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित कचरा हा डेपोत नेला जातो. कचरा व्यवस्थापनासाठी वर्षाला साडेचारशे कोटी रुपये खर्च केले जाते. कचरा प्रकल्पांसाठी ठेकेदार नेमण्यात आले आहेत. त्यातील बहुतांशी कामे पुन्हा-पुन्हा एकाच ठेकेदाराला दिली गेली आहेत. त्यात, २०१४-२०१९ च्या काळात भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आणि २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका माजी आमदाराच्या कुटुंबियांना मिळालेली आहे.

या माजी आमदाराने साधारपणे आठशे कोटी रुपयांची कामे केल्याचे दिसून येत आहे. त्यात बायोमायनिंग म्हणजे, डेपोतील कचरा बुजवून त्यावर माती टाकण्याच्या व्यवस्थेसाठी आतापर्यंत १०५ कोटी रुपये घेतले आहेत. प्रत्यक्षात हे काम झाले की नाही, याचे ऑडिट महापालिकेने केले नाही.

PMC Garbage Scam
Lalu Prasad Yadav Case : लालू प्रसाद यादव पुन्हा जेलमध्ये जाणार ? जामिनाविरोधात CBI सर्वोच्च न्यायालयात..

दुसरीकडे, या कामासाठी याच माजी आमदाराने आता पुन्हा १५० कोटी रुपयांचे काम घेण्याची धडपड सुरू केली आहे. त्याशिवाय, कचऱ्याची वाहतूकही त्यांच्याकडे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकारणातून सत्ता, सत्तेतून धाक आणि धाकातून ठेकेदारी करणाऱ्या या माजी आमदाराची नवी कुंडली उघड होणार आहे. याआधी हेच माजी आमदार वादात सापडल्याचे पुणेकरांनी पाहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com